शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी “एक राजा” जन्मास आला होता,
खेळण्याच्या वयात ज्यांनी तलवार, ढाल, भाला हातात घेतला होता….असे
“छत्रपती शिवाजी महाराज” होते म्हणून महाराष्ट्र घडला होता
स्वराज्य घडवण्यासाठी माझा राजा मुघलशाहीला एकटा नडला होता…..!!
आपल्या प्राणाची बाजी लावून, मावळ्यांनी “स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवलं होत,
याच मातीत “स्वतंत्र मराठा साम्राज्य” निर्माण झालं होतं,
“सूर्याहुन तेजस्वी राजा” नाव, इतिहासात कोरलं गेलं होतं,
आज सोनियाचा दिन उगवता झाला होता, (६ जून )
स्वराज्याची शपथ घेऊन “माझ्या राजाने” एक नवा इतिहास
घडवला होता…..!
✍️ विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
मुख्यसंपादक