Homeआरोग्यहळदीचे दूध पिण्याचे फायदे

हळदीचे दूध पिण्याचे फायदे

फार पूर्वीपासून चालत आलेली आपली परंपरा म्हणजे हळदीचे दूध घालून पिणे. भारतीयांच्या स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या पदार्थाना कधीच कमतरता येणार नाही आणि हळद ही तर त्यातील अविभाज्य घटक. सर्दी खोकला किंवा इतर काही वेळाही खूप महत्त्वाची भूमिका हळदी घालून बनवले दूध बजावते.
पण आधुनिक काळात हळदीचे दूध पिण्याचे प्रमाण थोडे कमी झाले असेल तरी त्याची आवश्यकता किंचितही कमी झली नाही. काही दिवसांपूर्वी ऐकण्यात आले की अमेरिकेत हेच हळदीचे दूध विकत आहेत पण त्याचे नाव मॉर्डन ठेवल्यामुळे जी पिठी परंपरागत चालत आलेल्या हळदीच्या दुधाला नावे ठेवत होती ती तरुणाई तेच जादा पैसे देऊन पिणार यांत तिळमात्र शंका नाही.
असो त्यामुळे त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहील हे ही नसे थोडके.

हळद युक्त दूध पिण्याचे फायदे-:

१) सर्दी खोकल्याची समस्या कमी होते.

२) रक्ताभिसरण कार्य सुधारते

३) थकवा दूर होण्यास मदत

४) चांगली झोप येते

५) त्वचेसाठी उपयुक्त

  • संकलन- लिंक मराठी टीम

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular