Homeक्राईमहोय ; हा देश तुरुंग भाड्याने घेणार आहे … वाचा काय आहे...

होय ; हा देश तुरुंग भाड्याने घेणार आहे … वाचा काय आहे हा प्रकार

         आम्हाला कल्पना आहे की हे शीर्षक वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असाव आणि हा प्रकार नेमका काय आणि कुठं घडतोय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुम्ही खूपच इच्छुक आहात.  डेन्मार्क येथे कैद्यांची संख्या वाढल्याने कोसोवो बरोबर तुरुंग भाड्याने घेणे- देण्याबाबत करार झाला आहे. यानुसार 300 कोठड्या 5 वर्षासाठी भाड्याने घेणार असून त्यासाठी प्रतिवर्षी 15 दशलक्ष युरो म्हणजेच 1, 28, 17, 20,000 रुपये भाडे देण्यात येणार आहे. 
        माहिती नुसार डेन्मार्क या तुरुंगात निर्वासित कैदी पाठवणार आहे . यामध्ये कायदे डेन्मार्क चे असतील हे स्पष्ट केले. कोसोवी मध्ये 700 ते 800 कोठडी रिकामी असून त्यातील यांनी 300 भाड्याने घेतल्या. 2023 पासून कोसोवी राजधानी प्रीस्तीनापासून 500किमी दूर असलेल्या गाझियन तुरुंगातील कोठड्या पुढील 10 वर्षे भाडे तत्वावर देणार व त्यातून ते 210 दशलक्ष युरो भाडे घेतील. 
    देशातील तुरुंग आणि तुरुंग अधिकारी यांच्यावरील बोजा या निर्णयामुळे कमी होईल असे डेन्मार्क च्या न्यायमंत्राच्या माहितीनुसार समजते. तडीपारीची शिक्षा झालेल्या निर्वासित नागरिकांना डेन्मार्क तुमची भविष्यात जागा येथे नसल्याचे चित्र यातून दाखवून देतंय ..
           तुरुंग भाड्याने घेण्याची ही कल्पना काही नवीन नाही यापूर्वीही अश्या घटना नार्वे ,  नेदरलँड , बेल्जियम येथे घडल्या असच्याचे समजते. 


https://linkmarathi.com/%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%82/


           तुम्हाला ही अशी रंजक व महत्वपूर्ण माहिती असेल तर लिंक मराठी इमेल वर स्वतःच्या नावासह पाठवा आम्ही ती प्रकाशित करू.  




अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular