नंदुरबार -: वनवासी व आदिवासी भागात काम करायचे म्हणजे अनेकांच्या अंगावर काटा येतो; पण रेणू रमेश वसावे (वय २७ )नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मात्र त्याला अपवाद आहेत.
कोरोना काळात नर्मदा काठावरील अंगणवाड्यात पोषण आहार पोहचवणे प्रशासनाला जिकरीचे आव्हान बनले होते. पण त्या अडचणींना मात केली.
नर्मदा काठावरील वनवासी गर्भवती महिला बोटीतून एकत्रितपणे पोषण आहार घेण्यासाठी अंगणवाडीत येत असत. पण कोरोनाच्या भीतीने त्यांनी येणे-जाणे बंद केले. ही गोष्ट अंगणवाडी सेविका वसावे यांच्या लक्षात आल्यानंतर सहा वर्षाखालील बालकांना आणि गर्भवती महिलांचे अयोग्य व विकासासाठी त्यांनी सकाळी ७:३०पर्यंत अंगणवाडीत पोहचतात . दुपार पर्यन्त काम करतात. जेवणानंतर बोटीने पाड्यावर जातात. दररोज १८ किमी एकट्याने बोटीतून जात. कधीकधी उशीराने घरी येत. अनेकवेळा तर जेवण व बालकांचे वजन काटे घेऊन डोंगर दऱ्यातून पायपीट करावी लागे.
दररोज १८किमी बोट चालवून हात दुखत असले तरी लोकांची सेवा करत मी माझी वेदना विसरते हा त्यांचा स्वभाव आहे.
अश्या असंख्य अंगणवाडी सेविकाना आणि रेणू वसावे यांना लिंक मराठी कडून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मानाचा मुजरा.
मुख्यसंपादक