८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा करतात?या मागचा दडलेला इतिहास पाहूयात…पूर्वी काही देशांत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यांना तो मतदानाचा अधिकार देण्याकरीता सोशालीस्ट इंटरनॅशनलच्या कोपनहेगन संमेलनात महिला दिनाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला.या दिनाच्या मागेही क्लारा जेटकीन या महिलेचा मोठा सहभाग आहे.क्लारा जेटकीन यांनी या परीषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला.या परिषदेत एकून १७ देशांच्या १०० महिलांनी सहभाग घेतला होता.व सर्वांनी या प्रस्तावाला संमती दर्शवली.या दिवसाचे महत्त्व तेव्हा वाढले जेव्हा फेब्रुवारी १९१७ म़ध्ये महिलांनी’रोजी रोटीऔर शांतता'(bread& peace)साठी आंदोलन केले आणि पुढे ते वाढत गेले.त्यानंतर जे सरकार आले त्या सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला.त्यावेळेस रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरत होते.त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा रविवार हा २३ तारखेला होता.पण जगभरात त्यावेळेस ग्रेगोरियन कॅलेंडर वापरात असल्यामुळे आणि त्या कॅलेंडरनुसार २३फेब्रुवारी हा दिवस जगभरात ८मार्च हा होता.म्हणूनच जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात.
भारतात ८ मार्च १९४८ ला पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.८ मार्च १९७१ ला पुण्यात या दिनानिमीत्ताने मोठा महिला मोर्चा निघाला.नंतर १९७५ हे वर्ष युएनओने ‘जागतिक महिला वर्ष’म्हणून घोषित केले.त्यानंतर महिलांचे प्रश्न चर्चेत आले आणि महिला संघटन२ंना बळकटी मिळाली.व पुढे स्त्री पुरूष समानता या दृष्टीने विचार केला गेला.पण खरं पाहता आजही तिला कमी लेखलं जातय.आज जरी कायदा स्त्रीयांच्या बाजूने असला तरी तिचं शोषन,बलात्कार,स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी यांसारख्या भीषण गोष्टींची ती अजुनही शिकार बनली आहे.अजूनही ‘तो आणि ती ‘ यांच्यात मोठा भेद आहे.जागतिक अहवालानुसार अजूनही अशे १८ देश आहेत जीथं पुरूषीय सत्ता, त्यांची हुकूमत चालते.पुरूष स्त्रीयांना काम करण्यापासून (जाॅब) रोखू शकतात.असा कायदा आहे.महिलांनी जरी पुरूषांएवढे काम केले तरी ग्लोबली त्यांना पुरूषांपेक्षा २३%पगार कमी मिळतो.जगभरातील लोकसंख्येपेक्षा महिलांची संख्या अर्धी असली तरी २.७ मिलीयनपेक्षा अधिक बायकांना त्यांच्या मनासारखा जाॅब करता येत नाही.आत्तापर्यंतच्या अहवालानुसार १२ मिलीयन मुली बालविवाहास बळी पडल्या आहेत.फौजदारी कायद्याच्या कलम १२५ नुसार घटस्पोटानंतर मागण्यातयेणारी पोटगी,विवाहीतेचा शारीरीक व मानसीक छळ,कौटुंबीक हिंसाचार प्रतिबंधक कायदा ,हुंडा प्रतिबंधक कायदा अशा अनेक कायद्यांची निर्मीती महिलांना संरक्षण देण्यासाठी केली असली तरी तिच्यावरील अत्याचार अद्याप कमी होवू शकले नाहीत.पुरूषी अहंकार वाढत जाऊन तिला कमी लेखलं जातय.महिला पुढे गेली तर तो त्याचा अपमान समजतो.त्याला स्वत:च वर्चस्व हवं असतं.
अजूनही तीला कमीच लेखलं जात तिच्या रूप आणि गुणांचं मोल पैशांत केलं जातं…
वंशाच्या भेदापोटी तिला उदरातच
चिरडलं जातं…
अजुनही समाजात अमानुष अत्याचाराचं वारं वाहतय…
- सौ.भाग्यश्री आपेगांवकर
ता- अंबेजोगाई
जि-बीड
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.
मुख्यसंपादक