(शैलेश मगदूम): कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त सिग्नल सैनिकांनी मिळून गडहिंग्लज येथे प्रथमच कॉर्प्स ऑफ सिग्नल्सचा 114 वा स्थापना दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला मोठया संख्येने सैनिकांनी आपल्या कुटुंबासहित हजेरी लावली. 15 फेब्रुवारी 1911 रोजी लेफ्टनंट कर्नल एम.एच. पौवल यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र संस्था म्हणून ‘कोर ऑफ सिग्नल ‘ ची स्थापना करण्यात आली. प्रथम आणि व्दितीय विश्वयुद्धात महत्वपूर्ण योगदान दिले. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिगेडियर कोर ऑफ 8 सिग्नलचे पहिले प्रमुख बनले. 1965 आणि 1971 च्या युद्धानंतर कोरचा विस्तार झाला. 1962 च्या भारत-चीन संघषर्षानंतर अचानक विस्तार झाला व दोन अतिरिक्त प्रशिक्षण केंद्र जबलपूर व गोवा येथे उभारण्यात आले.1980 च्या दशकाच्या मध्यात दळणवळण, प्रणालीची चाचणी घेऊन स्विचिंग आणि ट्रान्समिशन या दोन्ही साठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणारी पूर्ण भारतीय लष्करात पहिली एजन्सि बनली आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गडहिंग्लज तहसील सेवानिवृत्त सिग्नल सैनिकांनी सहकार्य केले.यामध्ये शिवार चित्रपटाचे दिग्दर्शक अतुल सावेकर यांनी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मुख्यसंपादक