जलधारा हिरवाईच्या

पाऊसधारा येता धरेवर,हर्षित होती सर्व चराचर.पर्ण फुलांना येई बहर,चैतंन्याचे रूप मनोहर. १ आषाढाचे कृष्णमेघ बरसता,धरणीशी ती येई शीतलता.ग्रीष्म ऋतूची दाहक तप्तता,विरूनी जाई बघता बघता. २ ऋतुचक्रातील ऋतू हिरवा,बळीराजाशी देई ओलावा.उगवे धरती अंकुर हिरवा,जणू हिरवाईचा सण नवा. ३ जलधारांनी तनमन भिजता,चैतंन्याने मन मोहरता,अंतरातले शब्द उमटता,जन्म घेतसे नवकविता. ४ नजराणा हा वर्षाऋतूचा,रंग गंध अन् सौंदर्याचा.वसुंधरेच्या शृंगाराचा,धरतीच्या नवसृजनाचा. … Continue reading जलधारा हिरवाईच्या