Homeमुक्त- व्यासपीठजलधारा हिरवाईच्या

जलधारा हिरवाईच्या

पाऊसधारा येता धरेवर,
हर्षित होती सर्व चराचर.
पर्ण फुलांना येई बहर,
चैतंन्याचे रूप मनोहर. १

आषाढाचे कृष्णमेघ बरसता,
धरणीशी ती येई शीतलता.
ग्रीष्म ऋतूची दाहक तप्तता,
विरूनी जाई बघता बघता. २

ऋतुचक्रातील ऋतू हिरवा,
बळीराजाशी देई ओलावा.
उगवे धरती अंकुर हिरवा,
जणू हिरवाईचा सण नवा. ३

जलधारांनी तनमन भिजता,
चैतंन्याने मन मोहरता,
अंतरातले शब्द उमटता,
जन्म घेतसे नवकविता. ४

नजराणा हा वर्षाऋतूचा,
रंग गंध अन् सौंदर्याचा.
वसुंधरेच्या शृंगाराचा,
धरतीच्या नवसृजनाचा. ५

कवी – श्री रेवाशंकर वाघ
डोंगरीपाडा ठाणे पश्चिम
९८२०१०४९१६

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular