पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्यावर हल्ला झाला असल्याचा दावा केला होता. दरम्यान, त्यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचा अहवाल निरीक्षकांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. निवडणूक आयोगानं विवेक दुबे आणि अजय नायक यांना अहवाल सोपवण्याचे आदेश दिले होते. चार पाच लोकांनी आपल्यावर हल्ला केला होता असा दावा पायाला झालेल्या दुखापतीनंतर ममता बॅनर्जी यांनी केला होता.
निरीक्षकांनी ममता बॅनर्जी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्याच्या शक्यता नाकारल्या असल्याचं अहवालात म्हटल्याचं इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. ‘आम्हाला ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. ज्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली त्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते,’ असं त्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. शनिवारी निवडणूक आयोगानं पश्चिम बंगाल सरकारचा अहवाल अपूर्ण असल्याचं म्हणत मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांना रविवारपर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यसंपादक