MNDA भाग ४
न्यासाच्या कर्त्याची निवड/ विश्वस्ताची निवड :-
जी व्यक्ती अथवा संस्था न्यासाची स्थापना करून न्यास आणि मालमत्ता यांची जबाबदारी एक किंवा जास्त विश्वस्तांवर सोपवते, तिला न्यासाचा कर्ता म्हणतात. कर्ता विश्वस्त म्हणून सुद्धा काम पाहू शकतो.
•••••••••••••••••••••••••••••••••••••
स्थावर मालमत्तेची विक्री :-
•••••••••••••••••••••••••••••••••••••
महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यात स्वयंसेवी संस्थेची स्थावर मालमत्ता धर्मादाय आयुक्तांना आगाऊ परवानगीशिवाय विकता, बदलता अथवा देणगी म्हणून देता येत नाही.
•••••••••••••••••••••••••••••••••••••
दोन किंवा त्याहून जास्त स्वयंसेवी संस्थाचे एकीकरण/ विलीनीकरण :-
•••••••••••••••••••••••••••••••••••••
महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या काही राज्यात धर्मादाय आयुक्तांनी, दोन किंवा अधिक सार्वजनिक ट्रस्टचे विलीनीकरण करण्यासाठी समान योजना तयार करण्याचे अधिकार आहेत. विश्वस्त निधी संस्थांचे व्यवस्थापन आणि प्रशासन, विलीनीकरण अधिक परिणामकारक आणि काटकसरीने होईल अशी त्यांची खात्री पटली कि ते अधिकार वापरू शकतात.
•••••••••••••••••••••••••••••••••••••
एखाद्या उद्दीष्टांमध्ये फेरबदल :-
•••••••••••••••••••••••••••••••••••••
ज्या उद्देशाने स्थापन करण्यात आली असेल ते उद्दिष्ट काही कारणाने वा परिस्थितीमुळे सफल झाले नसेल तर कायद्याच्या योग्य प्रक्रियेनुसार उद्दिष्ट बदलता येऊ शकते. मात्र बदललेले उद्दिष्ट असफल झालेल्या उद्दिष्टाच्या जवळपास असणारे असावे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••
निधीची गुंतवणूक :-
•••••••••••••••••••••••••••••••••••••
ना-नफा तत्वावरील स्वयंसेवी संस्थाना त्यांच्या निधी (रोख रक्कम) बँक, सार्वजनिक रोखे आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या युनिट्समध्ये गुंतवण्याची परवानगी असते. खाजगी कंपन्यांच्या शेअर्समध्ये निधी गुंतवण्याला कडक प्रतिबंद असतो.
•••••••••••••••••••••••••••••••••••••
ना-नफा तत्वावरील स्वयंसेवी संस्थांची गुंतवणूक किंवा ठेवीची प्रक्रिया व पद्धत, ट्रस्टस आणि अॅक्ट आणि प्राप्तीकर कायद्यात स्पष्टपणे दिलेली आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन : युवराज येडूरे, अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत •••••••••••••••••••••••••••••••••••••
मुख्यसंपादक