इस्लामपूर(हसन तकीलदार):-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक व उपजिल्हाप्रमुख शकिल सय्यद यांचे नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेचा जोरदार निषेध करत सन.1/04/2025ते मार्च 31मार्च 2026अखेरच्या वाढीव संकलित कराच्या बिलाची होळी करणेत आली.

यावेळी वाढीव बिल रद्द करा, झोपेचं सोंग घेणाऱ्या पालिका प्रशासनाचा निषेध असो, नहीं चलेगी, नहीं चलेगी हुकुमशाही नहीं चलेगी , कचरा संकलन कर रद्द झालाच पाहिजे अशा घोषणानी पालिका परीसर दणाणून सोडला. यावेळी शकील सय्यद यांनी प्रशासनाला धारेवर धरत अनेक प्रश्नांचा भडीमार केला. प्रशासन अधिकारी यांनी आम्ही शासन निर्णयानुसार कराची आकारणी केलीय असे स्पष्टीकरण देताच यावर सय्यद यांनी जिल्ह्यातील किंबहूना महाराष्ट्रातिल इतर पालिकेने कचरा गोळा करणेचा कर स्थिर ठेवला आहे काही पालिकांनी तर तो स्विकारलेलाच नाही. मग आमची पालिका काय बाहेर देशामध्ये आहे का ॽ ही हुकुमशाही चालणार नाही सांगली जिल्ह्यातील इतर पालिकेत सुद्धा काही नगरपरिषद मधे हा कर लागू नाही आपल्या लगत असलेल्या आष्टा पालिकेने उपयोग कर्ता कर फक्त 180/रु स्थिर ठेवला आहे,कराड ला ही हा कर स्थिर ठेवला आहे,जत, पलुस, शिराळा याठिकाणी हा करच नाही मग आमच्या मालमत्ता धारकांवर हा अन्याय काॽ हा कर पुर्णतः रद्द करा 2017ला हा कर शासन आदेशानुसार आपण लागु केला त्यावेळी पालिकेमध्ये नगरसेवक मंडळाने हा कर फक्त एक वर्षासाठी लागु करावा असा ठराव संमत करण्यात आला होता,मग प्रशासनाचा मनमानी कारभार करत हा कर प्रत्येक वर्षी 20 %नी वाढवुन मालमत्ता धारकांच्या माथ्यावर मारणार असाल तर आम्ही शिवसैनिक ते कदापि खपवून घेणार नाही हा कर पूर्णतः रद्द करा अन्यथा याही पेक्षा तिव्र जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा माजी नगरसेवक शकील सय्यद यांनी यावेळी दिला. त्यानंतर उपमुख्याधिकारी डॉ.भगवान खाडे, पद्मश्री दाईगडे व करविभाग अधिकारी यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील यांचेशी उद्या शिष्टमंडळासह बैठक घेऊन चर्चेने हा विषय संपवला जाईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी अशोक चव्हाण,मानव गवंडी,जमिर नालबंद,अरुण कुपाडे, ऍड.विकास लाखे,सिकंदर शेख,विनायक थोरात, रामराव थोरात ,इकबाल वाईकर,शकिल पटवेकर,दिपक कळसे, नितीन धुमाळ, प्रभाकर कुरळपकर,सुरज गवंडी,आदी शिवसैनिक उपस्थित होते.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



