Homeवैशिष्ट्येभाग -१० खर्च मंजूरीचे अधिकार

भाग -१० खर्च मंजूरीचे अधिकार


MNDA ✒️भाग:-10
खर्च मंजूरीचे अधिकारी प्रत्येक खर्चास योग्य त्या अधिकाऱ्याची पूर्वपरवानणी घेणे आवश्यक आणि हितावह आहे . संबधित अधिकाऱ्याने खर्चाची आवश्यकता , वाजवीपणा इत्यादी गोष्टींचा विचार करुन मगच खर्चास मान्यता द्यावयाची आहे . आणि कोणत्याही परिस्थितीत खर्चास मान्यता मिळाल्याखेरीज तो खर्च करु नये . खर्च करण्याचे अधिकार ट्रस्टीना अगर कार्यकारी मंडळाने ठराव करून योग्य त्या व्यक्तीस द्यावेत . आवश्यक वाटल्यास असे अधिकार खर्चाच्या मर्यादेनुसार निरनिराळ्या व्यक्तीस देण्यास हरकत नाही . उदा . रू . ५००० / -पर्यंतच खर्च कनिष्ठ अधिकारी रू . २५००० / -वरिष्ठ अधिकारी व रु . २५००० / – च्या पुढे कार्यकारी मंडळ , सर्व प्रकारचा भांडवली खर्च कार्यकारी मंडळ इत्यादी .
प्रवासखर्चाचे नियम प्रवासखर्चावर नियंत्रण राहणेच्या दृष्टीने प्रवासखर्चाबद्दल नियम करण्यात यावेत आणि त्या नियमांप्रमाणेच केलेल्या खर्चास मान्यता देण्यात यावी . यात निरनिराळ्या पदांसाठी विशिष्ट भत्ते ठरविण्यास हरकत नाही .
खर्चाची व्हाऊचर्स
खर्चाची व्हाऊचर्स म्हणजे खरेदी केल्याच्या , मंजुरी दिल्याच्या किंवा कोणत्याही बाबींवर केलेल्या खर्चाचा पुरावाच होय . दुकानदाराची बीले , स्टँड रिसीटस , रोखीच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे खर्चाची व्हाऊचर्स म्हणून जपून ठेवावी लागतात . त्याचबरोबर रिक्षा , टॅक्सी इत्यादीसाठी केलेल्या खर्चासाठी पावती घेण्याची प्रथा नाही . असा केलेला खर्च केलेल्या व्यक्तीने दिलेल्या पावतीद्वारेच ग्राह्य धरला जातात व खर्च करणारी व्यक्ती अशाप्रकारे व्हाऊचर्स तयार करते . कार्यालयीन उपयोगासाठी एका दर्शनी कागदावर सर्व तपशील लिहून त्यावर खर्चास मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेण्याची पध्दत आहे . अशाप्रकारे व्हाऊचर्स प्रत्येक खर्च रकमेसाठी कटाक्षाने केले जाते . ते आवश्यक आहे . दर्शनी व्हाउचर्स सर्व तपशील देण्यात यावा . दर्शनी व्हाऊचर्सवर ज्या खात्यात हा खर्च टाकावयाचा असतो , त्या खात्याची नोंद केली जाते . वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यावर स्वाक्षरी करण्यापूर्वी नोंदलेले खाते योग्य आहे ना हे पाहणे जरुरीचे आहे . खर्चाचे व्हाउचर्स नोंदवण्यापूर्वी त्यास अनुक्रमांक देण्यात यावेत .
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular