Homeकला-क्रीडासाहित्य चावडीवर कवितांचा पाऊस

साहित्य चावडीवर कवितांचा पाऊस

             साहित्य चावडीवर कवितांचा कार्यक्रम सुरू असतांनाच वरूण राजाने हजेरी लावत सर्व कवितांचं स्वागत केलं आल्हाददायक वातावरणात कविसंमेलन बहरत गेलं. जसे गाण्याला चांगले सूर मिळाले की उत्तम गाणे तयार होते तसेच काहींनी कवितेला चाल देऊन श्रोत्यांनी ऐकण्याचा आनंद लुटला. कवितेतली ओल न ओल श्रोते कान देऊन ऐकत होते. कारण प्रत्येकाच्या कवितेत एक संदेश, भाव, प्रेम होते. कोणाची कविता छोटी होती तर कोणाची कविता मोठी होती. प्रत्येक कवितेला अर्थ होता.कविते बरोबर मध्येच कोण चारोळी तर शायरी बोलत होता. कोनी तरी सुंदर वाक्य लिहिले आहे " जे न देखे रवी ते देखे कवी " विश्वाच्या पलीकडे बघणारा आणि आपल्या भावनांना व्यक्त करणारा म्हणजे कवी होय. साहित्यमधील सर्वात सर्वश्रेष्ठ प्रकार म्हणजे कविता होय. साहित्य चावडीवर कविता ऐकून सर्व मंत्रमुग्ध झाले. सर्वांच्या कविता खूप सुंदर होत्या.

          लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व समन्वयक अजीव पाटील यांच्या सहकार्याने मंगलमूर्ती मंदिरात साहित्य चावडीवर पाऊस मनामनातला या कार्यक्रमाचे आयोजन केले होते  सामाजिक वास्तव , अनुभव, प्रेम, निसर्ग या आशयाच्या कवितांचा धुवांधार पाऊस चावडीवर पडला.
  चावडी सरपंच गजानन राणे यांनी मार्गदर्शन केले. यंगस्टार्स ट्रस्ट अनेक उपक्रम राबवते पण साहित्य चावडी हा आगळावेगळा उपक्रम दर महिन्याला होतो याचा मला विशेष आनंद आहे. नवोदितांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार हितेंद्र ठाकूर यांचे आभार व्यक्त केले.

          पाऊस मनामनातला या कार्यक्रमात गीताश्री नाईक, सुरेश घरत, उज्ज्वला मूदप्पु, वैशाली चौधरी, सुप्रिया घोरपडे, अर्चना जुवाटकर, सुनिल आसनकर,विजय पराडकर, स्वप्निल जांभळे, प्रतिभा नवघरे, नभात पाटील, रूपाली राऊत असे एकापेक्षा एक सरस ३५ कवी सहभागी झाले होते. खार रोड पालघर वसई विरार नालासोपारा येथील कवी सहभागी झाले होते सर्व कविंचा सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला 

         मिठबावकर यांनी फोटोग्राफी केली खेळीमेळीच्या वातावरणात विक्रांत केसरकर व स्मरणात शेट्ये यांनी सुत्रसंचलन केले तर आभाराचा भार मधुकर तराळे यांनी उचलला.दिपाली जाधव , सुरेखा कुरकुरे व चावडी प्रेमी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
  • विरार प्रतिनिधी –
    स्वप्नील चंद्रकांत जांभळे
    मो.९६१९७७४६५६

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular