Homeघडामोडीशाहू ग्रुप अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या भादवण पंचक्रोशीत गाठी भेटीने चर्चेला उधाण

शाहू ग्रुप अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या भादवण पंचक्रोशीत गाठी भेटीने चर्चेला उधाण

भादवण ( अमित गुरव ) -: शाहू ग्रुप अध्यक्ष आणि भाजप मधून राजीनामा देऊन सध्या शरद पवार गटात सामील झालेले समरजित घाटगे यांनी तुतारी फुंकली आणि त्यानंतर त्यांनी पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पायाला भिंगरी लावून विधानसभा मतदारसंघात फिरत आहेत. आजारी लोक आणि इतर काही ग्रामस्थांच्या गाठी भेटी राजे गटाच्या माध्यमातून घेतल्या . राजे प्रेमी हरीश दिवेकर यांनी लिंक मराठी शी बोलताना सांगितले.
राजे गट गावागावात सक्रिय आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातून गाठी भेटी घेतल्या नंतर तर्कवितर्क सुरू झाले कारण स्वतःला भाजप पदाधिकारी म्हणून घेणारे आज राजेंच्या मागे खंबीर साथ देत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये असतानाही काही गट प्रमुख घाटगे यांना साथ देऊ शकतील का असा प्रश्न पडतो. तसे झालेच तर विद्यमान आमदार व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समस्येत वाठ होणार हे निश्चित. या सर्व समस्येचा सामना नाम मुश्रीफ कसे करणार की ते शरद पवार यांच्या चक्रव्यूह मद्ये गुरफटनार हे येणाऱ्या काळात समजेल.
भादवण येथे झालेल्या धावत्या भेटीवेळी भाजप चे मा. तालुका उपाध्यक्ष शैलेश मुळीक, हरीश दिवेकर तसेच आयडियल ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट
पूर्वीचे कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते जर श्री . घाटगे यांना विधानसभेसाठी शरद पवार गटातून साथ देत असतील तर ते नक्की भाजपचे की राजे गटाचे समर्थक होते ? अशी शंका सर्वसामान्य ग्रामस्थांना आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी येत आहे .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular