Homeघडामोडीसोमवारी आजऱ्यात वारकरी संप्रदाय मेळाव्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे रामकृष्ण हरी वारकरी...

सोमवारी आजऱ्यात वारकरी संप्रदाय मेळाव्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे रामकृष्ण हरी वारकरी मंडळाचे आवाहन…

आजरा(हसन तकीलदार )
सोमवार दि. 21/04/2025 रोजी आजरा येथे वारकरी संप्रदायाच्या मेळाव्याचे आयोजन केले असून तालुक्यातील वारकरी मंडळींनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज श्रमिक पतसंस्थेच्या माडीवर मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी कॉ संपत देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. सुरवातीला गौरोजी सुतार महाराज यांनी स्वागत आणि प्रास्तविक करून मेळावा का घेणार आहोत याची माहिती सांगितली. गेले वर्षभर आजरा तालुका वारकरी मंडळ तालुक्यात कार्यरत आहे. रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्था स्थापन केली असून या संस्थेची पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी मेळावा होत आहे. तयारीसाठी तालुक्यातील सर्वच गावात वारकरी मंडळींच्या सभा बैठका झाल्या आहेत.


आजच्या बैठकीला हा मेळावा श्रमिक पत संस्था सभागृहात सोमवारी २१ तारखेला ठीक सकाळी ११.०० वाजता होणार असून . सर्वानी मेळाव्याला उपस्थित रहावे. असे आवाहन राम कृष्ण हरी मांडळातर्फे करण्यात आले आहे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular