सलोनी शिंदे हिचे आदर्शवत कार्य…
आजरा (हसन तकीलदार ):-येथील सुनील शिंदे (शिक्षक )यांची कन्या सलोनी शिंदे ही पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये औषध विभागमध्ये काम करते . आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलोनी हिने आपला वाढदिवस वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. अनाथाना मदतीचा हात पुढे करीत तिने आपला वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा केला. सुनील शिंदे यांनी आपल्या मुलांना शिक्षणाबरोबरच संस्कार ही दिलेले आहेत. या संस्काराची प्रतिमा यामधून प्रतिबंबित होताना दिसून येते. वाढदिवस म्हटलं की केक, फटाके, डेकोरेशन, हुल्लडबाजी, अतिशबाजी, डी जे, वाद्ये हे नेहमीचेच ठरलेले आहे. परंतु सलोनीने या सर्वांना छेद देत पुणे येथील एका अनाथालयात आपला वाढदिवस साजरा करीत तेथील मुलांना जेवण, आईस्क्रीम, बिस्किटे, केक त्याचप्रमाणे असह्य उन्हाळ्यासाठी पंखे अशा वस्तू वाटप केल्या. आजच्या भरकटलेल्या, सुसंस्कृत पणा विसरलेल्या युवा पिढीला तिने एक नवीन आदर्श घालून दिला. समाजात शिक्षण घेताना आजची पिढी फक्त शिक्षित होताना दिसत आहे. परंतु संस्कारापासून कोसो दूर होत आहेत. उच्चशिक्षित जोडप्यांची मुले परदेशात शिक्षण घेऊन नोकऱ्या करताना त्यांना भारतीय संस्कृतीचा विसर पडलेला दिसत आहे.ज्यावेळी वृद्धापकाळात आई वडिलांना मुलांच्या सोबतीची गरज असते त्यावेळी ही मुले आपल्या करिअर आणि पैशात व्यस्त असतात आणि आई वडील वृद्धाश्रमात. शेवटच्या घटकेला आपल्या माता पिताला अंतिम संस्कारासाठी सुद्धा वेळ यांना नसतो हे दुर्भाग्य नाही तर काय आहे. अशा कित्येक घटना आवती भोवती घडत आहेत अशा संवेदना हरवलेल्या, नातीगोती विसरलेल्या, आदर्श संस्कृती हरवलेल्या युगात सलोनीचे हे कार्य खरोखरच उल्लेखनीय आणि स्तुत्य आहे. यावेळी तिचे वडील सुनील शिंदे म्हणाले की,प्रत्येक दिवशी समाजामध्ये अतिशय वाईट घटना घडत आहेत मग त्या सामाजिक असतील वैयक्तिक असतील राजकीय असतील नैसर्गिक असतील नैसर्गिक सोडल्या तर या घटना घडण्यामागे संस्कार करणारे कमी पडतात की काय याची भीती वाटते संयम आणि नम्रता हे शब्द हरवले की काय याची भीती वाटते आणि मग मला असं वाटतं यामध्ये खारीचा वाटा म्हणून माझ्या मुलांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही करावं त्यामध्ये सामाजिक आणि त्यांचा वैयक्तिक आनंदा असावा पण यामध्ये समाज दुखावेल असं कोणतंही काम असू नये सध्या वाढदिवस म्हणजे डीजे लावायचा आवाजाचे प्रदूषण फटाके फोडायचे हवेचे प्रदूषण समवयस्कर मित्रांना मद्यपान करायला द्यायचं शरीराचे नुकसान इतर मौजमजेसाठी वारेमाप खर्च करायचा आणि त्यामुळे वाढदिवस साजरा करणाऱ्याचा उध्वस्त दिवस म्हणावा लागेल.या सर्वांना बगल देण्यासाठी मी माझ्या मुलांना सांगितले की आपला प्रत्येक वाढदिवस समाजातील दीनदुबळे गोरगरीब यांना उभारी देणारा असावा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद टिकवणारा असावा तरच तो तुमच्या जीवनातील तुमचा अविस्मरणीय असा वाढदिवस असेल म्हणून माझी मुलगी कुमारी सलोनी शिंदे हिचा वाढदिवस मी पुण्यातील एका अनाथालयात साजरा केला तेथे मुलांना आईस्क्रीम बिस्किट केक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फॅन इत्यादी वस्तू दिल्या अनाथ मुलांना हे दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यानंतर मला मात्र त्या मुलांच्या चेहऱ्यामध्ये परमेश्वर दिसला.माझी मुलगी सलोनी ही माझ्यासारखीच सामाजिक हिताची काम करणारी आहे गेल्या वर्षीचाही वाढदिवस तिने कोल्हापूरमध्ये भुकेलेल्याना अन्न देऊन आपला वाढदिवस साजरा केला हे पाहिल्यावर मला असं वाटतं चांगले संस्कार कधीच मरत नाहीत ते एक समाजाला जिवंत करणारे अमृत आहे आणि हे अमृत प्रत्येक मानवामध्ये आहे ज्याप्रमाणे एक ज्योत अनेक ज्योतींना पेटवते त्याप्रमाणे प्रत्येकाने गोर गरीब गरजू लोकांना हातभार लावत एक सुंदर, आणि सुसंस्कृत समाज निर्माण करावा जो छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होता जो छत्रपती शाहूंना अपेक्षित होता.


मुख्यसंपादक



