सुरु झाला ढगांचा खेळ
तुफान सुटलाय वारा
कडाडली सौदामिनी
आल्या अवकाळी धारा
वाजत गाजत गर्जत
धो धो पाऊस पडतोया
नासधूस झाली रानाची
मनी बळीराजा रडतोया.
वासा मोडला गोठ्याचा
पालं उडाली गरीबाची
हवालदिल माझा शेतकरी
दैना देखवेना जनावराची.
नाही कसं म्हणू तुला
तुच आमचं जीवन
रागे ये नाहीतर प्रेमात
सारं करीन मी सहन
कवी किसन आटोळे सर
वाहिरा ता.आष्टी.
मुख्यसंपादक
Chan 👌👌👌