आजरा (हसन तकीलदार):- 16 जून शाळा प्रवेशोत्सव दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांनी आजरा तालुक्यातील सर्वात दूर व दुर्गम अतिपावसाच्या ठिकाणी असलेल्या धनगरवाडा, किटवडे शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर स्वागत करून शुभेच्छा दिल्या . ठीक सकाळी साडेनऊ वाजता संबंधित शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांना पुस्तके गणवेश ,खाऊ वाटप व व इतर साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी शाळेचे शिक्षक कोकितकर सर यांनी शाळेबद्दलची माहिती देऊन मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी कोकितकर सर खूप वर्षापासून सदर दुर्गम शाळेत काम करत असून मुलांची गुणवत्ता,अभ्यास तसेच त्यांच्या प्रयोगशील शैक्षणिक पद्धतीबद्दल चांगले प्रयत्न केल्यामुळे त्यांचे कौतुक केले. त्यानंतर तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व प्रशासनाला याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर जिल्हाधिकारी घाटकरवाडी येथील तलावामध्ये पर्यटन संबंधित काय उपाययोजना करण्यात येतील यासाठी भेट दिली . दाभिल येथील घनसाळ तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच घनसाळ तांदळाचे प्रतवारी सुधारून ब्रॅण्डिंग करणे त्याचप्रमाणे त्यामध्ये भेसळ होणार नाही यासाठी कशापद्धतीने प्रयत्न करता येईल याबाबत तालुका कृषी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. तहसील कार्यालयात सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून नैसर्गिक आपत्ती मधील उपाय योजना तसेच विविध प्रशासकीय कामे याबाबत सूचना देण्यात आल्या व आपत्तीकालीन परिस्थितीतील उपाय योजनांची माहिती घेतली यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, प्रांताधिकारी हरेश सुळ, तहसीलदार समीर माने,गटविकास अधिकारी संजय धमाळ,गट शिक्षण अधिकारी गुरव, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई तसेच महसूल अधिकारी,तलाठी,कर्मचारी आदिजण उपस्थित होते..
Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक



