Homeघडामोडीआजरा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करा शिवसेना ( उबाठा )ची मागणी

आजरा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करा शिवसेना ( उबाठा )ची मागणी

आजरा (हसन तकीलदार):-मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे नवीन डायलेसिस सेंटर सुरु करणेत आले आहे. त्याबद्दल सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त होत आहे. सर्वसामान्य, गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात डायलेसिसचा खर्च न परवाडणारा आहे. ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु झाल्यामुळे सर्वसामान्य, गरीब रुग्णांना याचा चांगला लाभ होत आहे.परंतु या सेंटरमध्ये जर एखादा रुग्ण अस्वस्थ झाला किंवा प्रकृती गंभीर झाली तर त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी एम. डी. मेडिसिन डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे पुढे जाऊन तो रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. यासाठी रुग्णालयात कायमस्वरूपी एम. डी मेडिसिन डॉक्टर नेमण्यात यावा असे जिल्हा शल्य चिकित्सक सी. पी. आर. कोल्हापूर यांना शिवसेना (उबाठा)तर्फे निवेदन देण्यात आले आहे.

या बरोबरच रुग्णालयात अनेक ग्रामीण भागातून लहान मुले मुली आजारी पडल्यानंतर त्यांचे पालक उपचारासाठी येथे घेऊन येतात. परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी बालरोतज्ञ नसल्यामुळे या बालकांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात अथवा गडहिंग्लजला न्यावे लागते, खाजगी दवाखान्यातील उपचार हे गरीब, सामान्य कुटुंबाना परवडणारे नाही. कायमस्वरूपी बालरोतज्ञ डॉक्टर नसलेने लहान मुलाबरोबर पालकांचेही हाल होतात. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे कायमस्वरूपी बालरोतज्ञ व एम.डी.मेडिसिन डॉक्टरांची नेमणूक करावी असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर तालुकाप्रमुख युवराज पोवार, युवा सेना उपजिल्हाप्रमुख महेशपाटील, हरिश्चंद्र व्हरकटे, अनपाल तकीलदार, बिलाल लतीफ, रवी सावंत, पांडू केसरकर, बबन चौगुले आदींच्या सह्या आहेत.

आजरा तालुक्यातील बातम्या साठी सोशल मीडिया फोल्लो करा

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular