मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यातील बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने कुपोषणमुक्तीचा लढा अधिक व्यापक व परिणामकारक ठरत असून, विविध यंत्रणांच्या समन्वित प्रयत्नांना अपेक्षित यश लाभले आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असून, हे राज्यासाठी मोठे यश मानले जात आहे.
राज्यात अतितीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण 1.93 टक्क्यांवरून थेट 0.61 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. तर मध्यम कुपोषितांचे प्रमाण 5.09 टक्क्यांवरून 3.11 टक्क्यांवर आले आहे. 2023 मध्ये 80,248 बालके अतितीव्र कुपोषित होती, ही संख्या 2025 मध्ये 29,107 इतकी राहिली. मध्यम कुपोषितांची संख्या 2,12,203 वरून 1,49,617 वर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की, “ही कामगिरी राज्य सरकारच्या एकात्मिक प्रयत्नांची फलश्रृती आहे. सामाजिक न्याय, मानव विकास आणि महिला-लहान मुलांच्या आरोग्यासाठी हे यश अत्यंत महत्त्वाचे आहे.”
या यशामागे महिला व बालविकास विभागाच्या ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजने’चा मोठा वाटा आहे.
▪️ 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना पुरक पोषण आहार
▪️ गरोदर व स्तनदा मातांना घरपोच आहार (THR)
▪️ 3 ते 6 वर्षांतील बालकांना गरम ताजा आहार (HCM)
या माध्यमातून पोषण पुरवठा नियमितपणे करण्यात येतो.
आदिवासी प्रकल्पांमध्ये विशेष लक्ष देत,
▪️ गरोदर मातांना चौरस आहार
▪️ बालकांना केळी, अंडी
▪️ अतितीव्र कुपोषितांसाठी विशेष केंद्रे
यांची स्थापना करण्यात आली आहे.
NURTURE आणि पोषण ट्रॅकर अॅपच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे संनियंत्रण आणि मूल्यांकन यशस्वीरित्या केले जात आहे.
संपूर्ण राज्यात 100% आहार पुरवठा, अचूक नोंदणी, वैयक्तिक लक्ष, गृहभेटी आणि सूक्ष्म नियोजन यामुळे हे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार उपाययोजना राबवून अधिकारी प्रशिक्षित करण्यात येत असून, नियमित आढावा बैठका घेतल्या जात आहेत.
राज्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल आता अधिक गतिमान झाली असून, हा उपक्रम इतर राज्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
व्हाट्सअँप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



