Homeघडामोडीनिर्भीड पत्रकार जाधव यांना ‘आचार्य अत्रे पुरस्कार’; पत्रकारितेतील योगदानाची दखल

निर्भीड पत्रकार जाधव यांना ‘आचार्य अत्रे पुरस्कार’; पत्रकारितेतील योगदानाची दखल

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) दैनिक जनमतचे विभागीय प्रतिनिधी आणि सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र पोर्टल व युट्युब चॅनलचे मुख्य संपादक, मनमिळाऊ स्वभाव आणि रोखठोक, निर्भीड पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मा. श्री. संभाजी जाधव यांना कोल्हापूर जिल्हा परिषद मार्फत दिला जाणारा ‘आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

संभाजी जाधव ( आजरा ) यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण घडामोडींवर आपल्या स्पष्ट, तथ्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण शैलीतून पत्रकारिता केली आहे. त्यांच्या निर्भीड लेखनशैलीने अनेक ठिकाणी अन्यायाविरोधात आवाज उठवून सामान्य जनतेसाठी पत्रकारितेचा उपयोग साधला आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेने त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन त्यांना प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून पत्रकारितेतील मूल्यांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार एक प्रेरणा ठरेल, असे मत अनेक क्षेत्रांतून व्यक्त होत आहे.

संभाजी जाधव यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

🟢 स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी एक नवी संकल्पना…

📢 “माहितीचा खजिना” आता तुमच्या खिशात!स्पर्धा परीक्षा म्हणजे तयारी, सातत्य आणि अपडेट राहणे…पण प्रत्येकवेळी वेगवेगळ्या ठिकाणी माहिती शोधायची वेळ, खर्च आणि श्रम हे आव्हानच असतं.

🟡 म्हणूनच… आम्ही घेऊन आलो आहोत एक नविन, उपयुक्त व विद्यार्थीप्रिय संकल्पना – ‘चालू घडामोडी’ही संकल्पना:

📌 तुमचा वेळ वाचवेल

📌 तुमचे पैसे वाचवेल

📌 दररोज नविन चालू घडामोडी तुमच्या मोबाईलवर मोफत पोहोचवेल

📌 स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे संक्षिप्त व मराठीत

✅ जर ही संकल्पना तुम्हाला आवडली तर आजच फॉलो करा

✅ तुमच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा

🎯 यशाच्या मार्गावर हा तुमचा विश्वासू सोबती ठरेल!

✍️ Link Marathi तर्फे — चालू घडामोडींची खात्रीशीर व सुलभ माहिती

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular