इचलकरंजी (हसन तकीलदार ):-समाजातील अनेक अडचणी अशा असतात की त्या न्यायप्रविष्ठ झाल्या तर दोन्ही पक्षांना त्रासदायक ठरतात. वेळ, पैसा आणि स्वास्थ्य सर्वकाही गहाण ठेवाव्या लागतात. यातून साध्य कमी तर तोटाच जास्त होतो. यासाठी इचलकरंजीमधील मुस्लिम समाज “सुलह “सेवा संस्था मुस्लिम समाजातील अनेक अडचणीतील लोकांना विनामोबदला कोणतीही फी न घेता निःस्वार्थपणे न्यायदान करून सुलह म्हणजेच तडजोड करण्याचे काम करीत आहे. याबाबतची निवेदनाद्वारे सविस्तर माहिती अप्पर पोलीस अधीक्षक इचलकरंजी -गडहिंग्लज,पोलीस अधीक्षक, शिवाजी नगर पोलीस स्टेशन, गावभाग पोलीस स्टेशन,शहापूर पोलीस स्टेशन, इचलकरंजी यांना देण्यात आली. या सर्वच अधिकाऱ्यांकडून यांच्या कार्याची दखल घेत कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

इचलकरंजी येथे मुस्लिम समाजातील अनेक अडी अडचणी ज्यामध्ये कौटुंबिक वाद, भाऊबंदकी तसेच नवरा बायकोचे भांडण होऊन सोडचिट्ठी पर्यंत आलेले विषय हाताळून दोन्ही कुटुंबाच्या लोकांना भविष्यातील होणाऱ्या नुकसानीची कल्पना देऊन पुन्हा एकत्रितपणे गुण्यागोविंदाने संसार करायला लावण्यास यश आलेले आहे.अशा रीतीने कुटुंबातील वाटणीचा विषय असो किंवा वृद्ध माता पित्यांना सांभाळण्याचा विषय असो असे बरेचसे विषय या संस्थेमार्फत गेल्या अडीच तीन वर्षात कायद्याच्या चौकटीत राहून इस्लाम धर्माच्या शिकवणीप्रमाणे माहिती देऊन बरेचसे विषय मार्गी लावले आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती निवेदनाद्वारे उपरोक्त अधिकाऱ्यांना दिल्यानंतर सर्वच अधिकाऱ्यांनी यांच्या या कामाचे कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी गौरवॊदगार काढताना अधिकाऱ्यांनी म्हटले की, यामुळे प्रशासन व पोलीस विभागावर येणारा ताण कमी होऊन जादाचे लागणारे काम बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे समाजामध्ये शांतीमय वातावरण निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे भाविष्यात या कार्याला आपणही मदत करण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले.

निवेदन देताना हाजी मसऊद गडकरी (अध्यक्ष ), जावेद मोमीन (उपाध्यक्ष ), बद्रेआलम देसाई (सेक्रेटरी ), रहमान मुल्ला (खजिनदार ), मौलाना जावेद चौधरी, मौलाना जावेद गवंडी, जाफर मुजावर, हाजी युसूफ तासगावे, नजीर पट्टेकरी, शकील बागवान, शफिक कडगे,मुंतजीर बागवान, मेहबूब पठाण, युसूफ दुर्ग आदिजण उपस्थित होते.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
व्हाट्सअप ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

मुख्यसंपादक

