आजरा (हसन तकीलदार ):-निलगीरी, आकेशिया यासारख्या परदेशी वृक्ष लागवडीमुळे जमिनिचा पोत बिघडणे, भूजलाची पाणी पातळी खालावणे, गवत वाढीवर प्रभाव पडून गवत वाढ न होणे यामुळे पर्यावरणीय अन्नसाखळ्यांना अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे अशा जंगल क्षेत्रामध्ये देशी प्रजातीच्या वृक्षांची लागण करणेचे नियोजन आराखडा केंद्र सरकारने तयार केला आहे. त्यानुसार शेंद्री ता. गडहिंग्लज येथिल पन्नास हेक्टर जंगल क्षेत्रावरील असणारी निलगिरी, आकेशिया या झाडांच्या ठिकाणी बांबूची लागण करण्याचे काम वन विकास महामंडळ (FDCM) ने हाती घेतले आहे.

हवेतील दुषित कार्बन शोषून घेणे व ऑक्सिजनचे हवेमध्ये उत्सर्जन करण्याची प्रक्रिया इतर वृक्षापेक्षा बांबूमध्ये जास्त प्रमाणात आहे. बांबू लागवडीसाठी उताराची ,मुरमाड जमिनीची गरज असते त्यानुसार बांबू लागवडीसाठी पूरक वातावरण असल्याने शेंद्री येथिल जंगल क्षेत्रामध्ये बांबूचे चांगल्या प्रकारे लागण होऊन त्यामुळे जमिनिमध्ये पाणी मुरवण्याची प्रक्रीयाही चांगल्या प्रमाणात होईल त्याचबरोबर पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने बांबू लागवडीचा या भागामध्ये चांगला फायदा होईल असे मत परिक्षेत्र वन अधिकारी रमेश कोळेकर यांनी व्यक्त केले.
प्रति सहा चौ.मी. क्षेत्रामध्ये एक रोप याप्रमाणे १३,९०० रोपांची लागण,पन्नास हेक्टर क्षेत्राच्या जंगल भागामध्ये करणेत येणार आहे.
सदरच्या वृक्ष (बांबू) लागणीची सुरुवात जिल्हा परिषद कोल्हापूरचे (प्राथ.) विभागाचे माजी शिक्षणाधिकारी आनंदराव जोशिलकर यांच्या हस्ते करणेत आले.

राजू पोतणीस(सरपंच परिषद राज्चिटणीस), इंजि. जी. एम. पाटील(कोल्हापूर जिल्हाध्यक्ष), संजय राऊत(सरपंच शेंद्री), शिवाजी राऊत (सदस्य सरपंच परिषद मुंबई) यांच्या उपस्थितीमध्ये वृक्ष लागवडीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या भागातील जंगलाचे आगी पासून संरक्षण करणे व जंगल संवर्धन करणेची जबाबदारी सरपंचांचे पुढाकाराने सर्व ग्रामस्थानी घेतली, यावेळी निसर्गप्रेमी राजू देशपांडे (होन्याळी),शेंद्री गावचे पोलिस पाटील शंकर पाटील, माजी उपसरपंच दयानंद तोडकर,ग्रामपंचायत सदस्य महादेव मोरे,रोजगार सेवक सुनिल दादू घेवडे,ग्रामपंचत सदस्य मारुती भिमा नाईक, गौरव चौगुले ,वन विकास महामंडळ (FDCM) गडहिंग्लजचे वनरक्षक महेश एकशिंगे व वनमजूर गंगाधर तोडकर त्याचबरोबर ग्रामस्थ उपस्थित.
आजच फोल्लो करा आणि रहा अपडेट्स
व्हाट्सअँप चॅनेल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://facebook.com/profile.php?id=100063705265578
युट्युब लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news

मुख्यसंपादक



