आजरा (हसन तकीलदार):- आजरा येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या सुचनेनुसार शिवसेनेच्या प्राथमिक व क्रियाशिल सभासद नोंदणीची सुरवात उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत व तालुका प्रमुख संजय पाटील यांचे हस्ते करणेत आली.
यावेळी आजरा जिल्हा परिषद संपर्क प्रमुख जितेंद्र भोसले, उपतालुका प्रमुख काकासो देसाई, आत्मा कमीटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई,शहर प्रमुख विजय थोरवत, माजी ग्राम पंचायत सदस्य दयानंद निऊंगरे,युवराज पाटील, सुनिल दिवेकर,रणजीत सरदेसाई,विजय कोंडुस्कर व इतर पदाधीकारी उपस्थीत होते. या प्रसंगी तालुका प्रमुख संजय पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्य मंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करणेसाठी पहिल्या टप्यात पाच हजार प्राथमिक सदस्य नोंदणी करणार असून एक हजार क्रियाशिल सदस्य नोंदणी या चार दिवसात पूर्ण करणार असल्याचे सांगीतले.

अजून ज्यांना फॉर्म मिळालेले नाहीत त्यांनी नामदार प्रकाश आबीटकर संपर्क कार्यालय आजरा येथे संपर्क साधावा याठिकणी फॉर्म उपलब्ध उपलब्ध केले आहेत. तसेच संतोष भाटले,विजय थोरवत यांचेशीही संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक


