Homeकला-क्रीडाकबड्डी स्पर्धेत व्यंकटाराव मुलांच्या व मुलींच्या संघांची जिल्हास्तरासाठी निवड

कबड्डी स्पर्धेत व्यंकटाराव मुलांच्या व मुलींच्या संघांची जिल्हास्तरासाठी निवड

आजरा (हसन तकीलदार)जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर आयोजित पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा मार्फत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आजरा येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी तालुक्यातून सतरा संघांनी सहभाग घेतला त्यामध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील मुलांनी व मुलींच्या संघानेही तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत उज्वल सुयश संपादन केले व कबड्डी या खेळ प्रकारात आपला दबदबा कायम ठेवला. या दोन्ही संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


या यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार व वर्गशिक्षकांचे प्रोत्साहन लाभले तसेच क्रीडाशिक्षक एस.एम. पाटील, सहाय्यक विभाग प्रमुख श्रीमती आर.एन. पाटील, मस्कर सर ,आर. पी.पाटील, श्रीमती एस. बी.कुपेकर, पोवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“ताज्या मराठी घडामोडी आणि नानाविध व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच Link Marathi चॅनेल Subscribe आणि Follow करा!” 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular