अशोक गुरव यांच्या सेवेतील प्रवास
१८ ऑगस्ट १९९२ साली प्राथमिक शिक्षक बँकेत क्लार्क पदा पासून ते आज पासिंग ऑफिसर पदापर्यत मजल मारलेले अशोक रा. गुरव यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम सम्पन्न झाला. २९ वर्षे सेवा बजावणाऱ्या गुरव यांचा सर्वसामान्य ते असमान्यांशी जवळची नाळ त्यामुळे कोरोनाच्या या माहामारीत साधेपणाने करावा लागलेला कार्यक्रम सर्वांच्या जिव्हाळी लागला ; असला तरी दिवसभर हितचिंतकांचे सतत खनखनारे फोन त्यांच्या कामाची पोचपावती देत होते.
माझ्या मिडीकल मधून गोळ्या आणा पासून ते माझे पैसे विश्वासाने आणणारा माणूस म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत इतकेच काय तर ते स्वतःच्या ATM चा पासवर्ड ही त्यांना सांगून ठेवत. एकमार्गी चालणारा व सहकार्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार आपल्या हक्काचा माणूस रिटायर झाला त्यामुळे सहकारी भावुक होतेच पण साहेब आता निवांत राहतील म्हणून आरोग्यदायी शुभेच्छा देत होते.
त्यांची अनेक वैशिष्ट्ये त्यातील बँके चालू होण्याआधी म्हणजे वेळेपूर्वी 10 मिनटं हजर राहणे , कोणतेही सभासद आले की त्यांना आदरातिथ्य करून वेळेत काम करून देणे , सहकार्यांशी सहकार्य भावनेने चोख काम करणे अशी अनेक सांगता येतील.
सेवानिवृत्ती कोणत्याही
रस्ताचा अंत नसून ,
एका नवीन हायवे ची
सुरवात आहे …
आजरा शाखेच्या निरोप समारंभ तथा सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संचालक संभाजी बापट होते . सूत्रसंचालन रावसाहेब पाटील यांनी करून आपल्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला. शाल व श्रीफळ देऊन बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात संचालक संभाजी बापट यांनी अशोक गुरव याची वेळेत हजर राहण्याच्या व कामप्रति असलेल्या निष्ठेचे कौतुक केले. तसेच त्यांना शाखाधिकारी म्हणून कामाची संधी मिळाली असती पण अकस्मित झालेल्या अपघातामुळे ते होऊ शकले नाहीत याची खंत बोलून दाखविली.
प्रा. पांडुरंग भादवणकर यांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर भाष्य केले व पुढील काळात आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या. अमित गुरव यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
मान्यवरांच्या अशोक गुरव यांच्या विषयीची मते व्हिडीओ स्वरूपात …
https://www.facebook.com/watch/?v=178082630985672
मुख्यसंपादक