Homeघडामोडीबुरुडे येथे निरोप व सत्कार समारंभ उत्साहात

बुरुडे येथे निरोप व सत्कार समारंभ उत्साहात

आजरा(हसन तकीलदार):- बुरुडे ता. आजरा येथे मुख्याध्यापकांची बदली झालेबद्दल निरोप समारंभ व विविध पदावर नियुक्ती झालेल्यांचा जाहीर सत्कार समारंभ नुकताच बुरुडे येथील ग्रामदैवत दत्त मंदिर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकांत सावंत होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर. पी. आय. (गवई)पक्षाचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत कांबळे यांनी केले.


विद्यामंदिर बुरुडेचे मुख्याध्यापक मायकल फर्नांडिस यांची बदली सोहळे येथे झालेबद्दल माजी विस्तार अधिकारी शशिकांत सावंत यांचे हस्ते निरोप समारंभानिमित्य सत्कार करण्यात आला. तर शशिकांत सावंत यांची आजरा तालुका संजय गांधी निराधार कमिटीच्या सदस्य पदी निवड झालेबद्दल शिवाजी जोशीलकर यांचे हस्ते, महेश कदम यांची मागासवर्गीय सेलचे आजरा तालुकाध्यक्षपदी निवड झालेबद्दल भीमराव जोशीलकर यांचे हस्ते, दयानंद बागवे यांची आजरा तालुका ग्रामीण उपाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल सूर्यकांत कांबळे यांचे हस्ते, हणमंत जोशीलकर यांची आजरा तालुका ग्रामीण सचिव पदी निवड झालेबद्दल सदाशिव कांबळे यांचे हस्ते तर गोपाळ होण्याळकर यांची रिपब्लिकन सेनेच्या आजरा तालुका उपाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल दत्ता तेंडुलकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली आभार सूर्यकांत कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“रणसंग्राम आजऱ्याचा सुरू झाला आहे…
तुमच्या गावाचा, तुमच्या भवितव्याचा आणि तुमच्या आवाजाचा हा निर्णायक क्षण!
घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि सत्य माहिती मिळवण्यासाठी—
आत्ताच ‘Link Marathi’ YouTube चॅनेल Subscribe करा.
रणभूमीवरचा प्रत्येक अपडेट सर्वात आधी… फक्त इथे!”

युट्युब लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

व्हाट्सअप लिंक 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

बातम्या देण्यासाठी संपर्क साधा – अमित गुरव , हसन तकिलदार
8421666667

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular