Homeघडामोडीमालिग्रे येथे भावेश्वरी रुग्णवाहिका सेवेचे उदघाटन : 2008-09 बॅचचा अनोखा उपक्रम

मालिग्रे येथे भावेश्वरी रुग्णवाहिका सेवेचे उदघाटन : 2008-09 बॅचचा अनोखा उपक्रम

भादवण ( सुभाष पोवार ) :
गावातील आरोग्य सेवेची उभारणी करण्यासाठी भादवन येथील 2008-09 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एक अनोखा आणि आदर्शवत उपक्रम राबवत भावेश्वरी रुग्णवाहिका सेवा सुरू केली. मालिग्रे येथे भावेश्वरी मंदिर परिसरात झालेल्या या रुग्णवाहिका सेवेच्या उदघाटन प्रसंगी सरपंच सौ. शारदा गुरव अध्यक्षस्थानी होत्या.

आरोग्य आणि शिक्षण ही मूलभूत गरज – सरपंच शारदा गुरव

या ठिकाणी बोलताना सरपंच सौ. शारदा गुरव म्हणाल्या,
“आरोग्य व शिक्षण ही मूलभूत गरज आहे. अशा सेवाभावी उपक्रमांत गावातील नवनिर्मित उद्योजक, युवावर्ग आणि नोकरी करणारी तरुण पिढी पुढे आली पाहिजे. सेवा अखंड राहण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.”

“रुग्ण हीच ईश्वरसेवा” – अनिरुद्ध रेडेकर

समूहाचे सचिव अनिरुद्ध रेडेकर म्हणाले,
“एका रुग्णाचा खर्च संपूर्ण कुटुंबाला वर्षभर मागे नेऊ शकतो. म्हणूनच आम्ही ही सेवा सुरू करण्याचा निश्चय केला. भावेश्वरी रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सुविधा असेल आणि रुग्णाचा खर्च केदारी रेडेकर धर्मालय रुग्णालयाच्या कोट्यातून मोफत दिला जाईल.”

यावेळी त्यांनी किशोर जाधव व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करत आगामी योजनांची माहिती दिली.

समाजहिताचा अभिनंदनीय उपक्रम – मान्यवरांचे गौरवोद्गार

आजरा सहकारी शेतकरी कारखान्याचे माजी संचालक सुभाष देसाई, धीरज देसाई, डॉक्टर बोकरे आणि संचालक अशोक तरडेकर यांनी विद्यार्थ्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत म्हणाले,
“ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत उपचार मिळणे सर्वात महत्त्वाचे आहे. अशा सेवेची आज पंचक्रोशीत नितांत गरज आहे.”

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन श्री. संजय घाडगे यांनी केले.
आभार प्रदर्शन विश्वास बुगडे यांनी केले.

प्रमुख उपस्थिती, डॉ. संगीता फारमर, डॉ. गोखले, पोलीस पाटील मोहन सावंत, वैद्यकीय उपसेविका सौ. मंगल पाटील, सौ. सुधा मोहिते, माजी सरपंच अशोक शिंदे, मनीषा हरेकर, बिपिन जाधव, शिवसेना समन्वयक धनाजी बुगडे, जगन्नाथ बुगडे, दिलीप बुगडे तसेच ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!

📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular