Homeघडामोडीरामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा सरोळी येथे कार्यक्रम

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा सरोळी येथे कार्यक्रम

आजरा(हसन तकीलदार):- जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम, रत्नागिरी यांचा बुधवार दि.१० डिसेंबर २०२५ रोजी सरोळी ता.आजरा येथे सकाळी ९ वाजले पासून पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रमासह संपन्न होत आहे.
या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून दि. ९ डिसेंबर रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांचे सरोळी येथील आकाराम देसाई यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार आहेत.स्वागत,पादुका पूजन व भजन सोहळा संपन्न होणार आहे. दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजले पासून सरोळी गावातून जगद्गुरूंच्या सिद्ध पादुकांची रथातून भव्य शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रे मध्ये विविध पथक असणार आहेत ही शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे १० वाजेपर्यंत शोभायात्रेचे कार्यक्रम स्थळी प्रस्थान होणार आहे. त्यानंतर ११ वाजता ज.न.म. संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी १६ घरघंटी चे वाटप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
त्यानंतर मान्यवरांचे मनोगत संपन्न होणार असून पादुका व गुरुपूजन सोहळा,आरती सोहळा ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ. गौराताई चौगुले यांचे प्रवचन संपन्न होणार आहे त्यानंतर रामानंद संप्रदाय मध्ये नविन समाविष्ट होणाऱ्या भक्तगणांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे . तदनंतर पादुका दर्शन सोहळा संपन्न होणार आहे.सदर कार्यक्रमास उपस्थित राहून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा असे आवाहन रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी सुमारे दहा ते पंधरा हजार भाविक भक्तगण उपस्थित राहणार असलेचा अंदाज असून सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले आहे.हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे आजी माजी पदाधिकारी
व आजरा तालुक्यातील पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत या कार्यक्रमासाठी भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टीने होणार आहे.

✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!

📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular