आजरा(हसन तकीलदार) …येथील व्यंकटराव शैक्षणिक संकुल आजरा अंतर्गत व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा मधील इयत्ता पहिली ते चौथी या वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आज आषाढी एकादशी निमित्त साक्षात विठ्ठल- रखुमाई, आणि वारकरींची वेशभूषा केली होती. साक्षात पांडुरंगाच्या नामाचा गजर.. टाळ मृदुंगाच्या नादात साक्षात या बालचमु वारकऱ्यांची दिंडी प्रशालेच्या प्रांगणात व विठ्ठल रुक्माई मंदिर,आजरा शहरात काढण्यात आली. साक्षात विठ्ठल रुक्मिणी अवतरल्यासारखे वाटत होते. या दिंडीत वेशभूषेतील विद्यार्थी त्यांचे पालक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला टाळ मृदंग आणि नाम घोषाने शाळेचा परिसर भक्ती सागरात डुंबून गेल्याचे दिसत होते… मैदानावर रिंगणही केले होते व व्यासपीठावर माऊली- माऊली या गीतावर विद्यार्थी विद्यार्थिनी नृत्य सादर केले.

या बाल वारकरी विद्यार्थी मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सचिव अभिषेक शिंपी, खजिनदार सुनील पाटील, संचालक सचिन शिंपी, विलास पाटील, प्राचार्य एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ व्ही.जे शेलार,आर. व्ही. देसाई(मुख्याध्यापक ),
डी.बी.डेळेकर सौ.एल.पी.कुंभार
सौ.एन. एन.पाष्टे, सौ.एन.सि. हरेर, सौ.आर एच गजरकर,
सौ.एम. व्ही.सावंत उपस्थित होते.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचं व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
🎙️ Follow Us 🎙️
*You Tube चॅनेल लिंक* 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=9fVf1D0sqOPFWHQS
*व्हाट्सअँप चॅनेल लिंक*👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक