वाटंगी -:
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कॅन्सरचे लवकर निदान व्हावे तसेच तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला मिळावा या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये एकूण ४१ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथील २५v, मलिग्रे ८, उत्तूर ७ आणि भादवण येथील १ रुग्णाचा समावेश होता. तपासणीनंतर संबंधित रुग्णांना आवश्यक उपचार, पुढील तपासणीसाठी संदर्भ सेवा तसेच कॅन्सरविषयक आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांकडून थेट तपासणीची सुविधा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डॉ. स्मिता पाटील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. अतुल पाथरवट यांनी केली, तर साबखान यांनी आभार प्रदर्शन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी, मलिग्रे, उत्तूर व भादवण येथील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

मुख्यसंपादक



