भादवण -: केदारनाथ मंदिराच्या भक्तीमय वातावरणात आज सेवाभावाचा एक सुंदर क्षण अनुभवायला मिळाला. अजित भिवा पाटील, सुभाष तुकाराम गाडे आणि प्रशांत परबत पाटील या केदारनाथ भक्तांकडून मंदिरासाठी नवीन साउंड मशीन भक्तिभावाने अर्पण करण्यात आली.
ही साउंड मशीन मंदिराचे पुजारी आणि सर्व केदारनाथ भक्तांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आली. या वेळी भक्तीचा नाद अधिक स्पष्ट आणि प्रभावी व्हावा, हा या सेवेमागील शुद्ध भाव असल्याचे देणगीदारांनी सांगितले.
मशीन स्वीकारताना मंदिराचे पुजारी आणि उपस्थित भक्तांकडून सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले. “चांगभलं” च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण भक्तीमय झाले.
अशा सेवाभावी उपक्रमांमुळे मंदिराची धार्मिक परंपरा अधिक दृढ होत असून, समाजात श्रद्धा, एकोप्याची आणि सेवाभावाची भावना वृद्धिंगत होत आहे, असे उपस्थित भक्तांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.

मुख्यसंपादक



