Homeघडामोडीगॅस टंचाईची चर्चा : भादवण पंचक्रोशीत सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी. लाडक्या बहिणी पुन्हा...

गॅस टंचाईची चर्चा : भादवण पंचक्रोशीत सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी. लाडक्या बहिणी पुन्हा चुलीकडे वळणार ?

आजरा ( अमित गुरव ) – : अमेरिका-इराण तणावामुळे इंधन टंचाईच्या चर्चांना उधाण आले असताना त्याचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. आजरा तालुक्यातील भादवण पंचक्रोशीत गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र गॅसचा स्टॉक उपलब्ध नसल्याने अनेकांना निराश होऊन परत जावे लागले.


सकाळपासूनच अनेक महिला व नागरिक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी जमा झाले होते. काहींनी गॅस गाडी कधी येणार याची चौकशी केली असता सध्या स्टॉक उपलब्ध नसल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे अनेकांना हताश होऊन परतावे लागले.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर गॅस टंचाईबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅस वेळेवर मिळाला नाही तर पुन्हा चूल पेटवावी लागेल का, अशी चर्चा काही महिलांमध्ये सुरू असल्याचेही पाहायला मिळाले.


ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी गॅस हा मुख्य पर्याय बनला असताना अशा प्रकारची टंचाई निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे गॅसचा नियमित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने आणि संबंधित कंपन्यांनी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंचक्रशीतील नागरिकांकडून होत आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular