Homeघडामोडीजागतिक ग्राहक दिनानिमित्त १८ मार्चला आजरा तहसील कार्यालयात कार्यक्रम; सर्व विभागांनी नागरिकांना...

जागतिक ग्राहक दिनानिमित्त १८ मार्चला आजरा तहसील कार्यालयात कार्यक्रम; सर्व विभागांनी नागरिकांना माहिती द्यावी – तहसीलदार समीर माने

आजरा : दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक ग्राहक दिन आजरा तालुक्यात साजरा करण्यात येणार आहे. १५ मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो; मात्र त्या दिवशी सुट्टी असल्याने दि. १८ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय, आजरा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून आपल्या विभागाच्या सेवा व योजनांची माहिती नागरिकांना द्यावी, असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


या कार्यक्रमाद्वारे नागरिकांना विविध शासकीय विभागांकडून मिळणाऱ्या सुविधा, सेवा, तसेच ग्राहक हक्कांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जागतिक ग्राहक दिन दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा केला जातो. ग्राहकांचे हक्क, सुरक्षितता आणि योग्य माहिती मिळावी यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. १९६२ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या हक्कांबाबत केलेल्या घोषणेनंतर या संकल्पनेला जागतिक स्तरावर चालना मिळाली. त्यानंतर १९८३ पासून जगभरात १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.


ग्राहकांचे हक्क, संरक्षण आणि जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular