भादवण ( अमित गुरव ) : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF) अंतर्गत भादवण गावात शेतकरी गटाची स्थापना करण्याच्या अनुषंगाने मंगळवार, दि. 23 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयातील महाडिक हॉल येथे बैठक व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी नैसर्गिक शेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असून इच्छुक शेतकऱ्यांना शेतकरी गटात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना नाचणी बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.या बैठकीस भादवण गावातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


मुख्यसंपादक



