आजरा तहसील कार्यालयात जिल्हा जनगणना पुस्तिका 2026 तयार करण्यासंदर्भात एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर पार पडले. गावनिहाय लोकसंख्या, घरे, शेती, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांची अचूक माहिती संकलित करून ती ऑनलाइन पोर्टलवर वेळेत अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राथमिक मसुदा 15 ऑगस्टपर्यंत, तर अंतिम पुस्तिका 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
शिबिरास जिल्हा समन्वयक जनगणना अधिकारी तुषार पाटील, तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, जिल्हा सांख्यिकी अधिकारी तसेच 19 ग्राम महसूल अधिकारी आणि 49 ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. जिल्हा सांख्यिकी अधिकाऱ्यांनी पुस्तिकेचे स्वरूप, नव्या सुधारणा आणि डेटा एंट्री प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

मुख्यसंपादक


