भादवणमध्ये पावसाच्या सरी बरसत असल्या तरी शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीमुळे गावातील राजकीय नव्हे, तर शैक्षणिक वातावरणात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड प्रक्रियेला आता वेग आला असून, प्रत्येक पालक मतदाराचे महत्त्व वाढले आहे. इच्छुकांकडून पालकांच्या भेटीगाठी, संवाद आणि संपर्क वाढल्याची चर्चा गावात सुरू आहे.
अध्यक्षपदासह समितीतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसाठी कोणाला संधी मिळणार, याबाबतही ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे. वेळ कमी असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
https://www.instagram.com/reel/DcEY9J7Nu1b/?igsh=MW9qNm0wYzV1ZXNkZA==
दरम्यान, मतदानाची पद्धत कशी असावी, याबाबतही काही पालकांमध्ये चर्चा सुरू आहे. विशेषतः उघड मतदान झाल्यास मतदारांवर कोणताही दबाव निर्माण होऊ नये, अशी काहींची भावना असल्याचे बोलले जात आहे.
मात्र अंतिम निर्णय मतदार काय घेतात आणि SMC ची धुरा कोणाच्या हाती जाते, याकडे आता भादवणचे लक्ष लागले आहे.
पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक नाही… पण चर्चा मात्र तितकीच रंगली आहे!


मुख्यसंपादक



