चुरशीच्या वातावरणात गुप्त मतदान; १४ सदस्यांची निवड, शाळेच्या विकासाची जबाबदारी नवनिर्वाचित समितीवर
भादवण : भादवण येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) निवड प्रक्रियेला अखेर पूर्णविराम मिळाला. पालकांमध्ये चुरस असलेल्या या प्रक्रियेत गुप्त मतदानाचा पर्याय स्वीकारण्यात आला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
निवड प्रक्रिया चुरशीची असल्याने केंद्रप्रमुख संजय भोसले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रक्रियेवर लक्ष दिले, हे विशेष ठरले. निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पालक आणि इच्छुक उमेदवारांमध्ये भेटीगाठी व चर्चांना वेग आला होता.
दरम्यान, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासह शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका, पालकांचा मतदानाचा हक्क, निवड प्रक्रियेतील नियम तसेच नवनिर्वाचित सदस्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबत माहिती देण्यात आली.
नवनिर्वाचित सदस्य
शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पुढील १४ सदस्यांची निवड झाली आहे :
धनश्री अमित कांबळे
अंकुश चंद्रकांत खवरे
विजय अनंत पाटील
सुनिता प्रकाश केसरकर
अविनाश सखाराम कोलते
पूजा अमोल हाळवणकर
निलेश गणपती सुतार
ज्योती संतोष डोंगरे
सुरेखा जितेंद्र सुतार
विजय विष्णू खुळे
शैलेंद्र तुळशीराम मुळीक
पूजा रोहित पाटील
साधना संजय केसरकर
शांताराम आनंदा पाटील
यानंतर झालेल्या पदाधिकारी निवडीत निलेश गणपती सुतार यांची अध्यक्षपदी, तर पूजा अमोल हाळवणकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
आता अपेक्षा शाळेच्या विकासाच्या
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नवनिर्वाचित समितीसमोर शाळेच्या विकासाची आणि विद्यार्थ्यांच्या हिताची जबाबदारी आहे. शाळेतील सुविधा, विद्यार्थ्यांचे प्रश्न, पालकांचा सहभाग आणि शाळेच्या विकासकामांमध्ये समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
पुढील अपडेट
नवनिर्वाचित SMC सदस्यांचे नेमके अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय असतात? शाळेच्या विकासात समितीची भूमिका किती महत्त्वाची असते? याबाबत सविस्तर माहिती लवकरच.
अशाच स्थानिक शैक्षणिक, सामाजिक आणि महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी amitguravofficial सोबत जोडलेले राहा. लिंक क्लिक करु शकता.👇
https://www.instagram.com/amitguravofficial?igsh=ajEwZndsY2dsa2


मुख्यसंपादक



