मी पाहिलेले ते चित्र
चित्र विचित्र ,एक सत्य चित्र
जो तो धावत आहे सैरावैरा
जीव मुठीत धरून ,
तान्हा बाळाला कवटाळून
आई धावत आहे
नातवाचा आधार घेऊन
आजीही धावत आहे ,
पण ही धाव ठरली कुंपणापर्यत ।।
चाललंय का कधी कोणाचं
निसर्गासमोर ,
इवले इवले जीव झाले निष्पाप
डोळ्यासमोर ।।
आला आला पूर
आली वाट सुनामी ,
नका दोष देऊ कोणा
याला जबाबदार तुम्ही -आम्ही
ही तर नुसती सुरवात
ज्वालामुखी, भूकंप तर पुढेच आहे
अजून खूप काही बाकी आहे
निसर्ग नष्ट करून दिस अन रात
मानवानेच केला मानवाचा घात
मानवा । एक जरा
निसर्गराजा कोपण्याआधी
देऊ मानवतेला आधार ,
करून एक निर्धार , घेऊ निसर्ग सांभाळण्याचा भार ।।
मुख्यसंपादक