Homeमुक्त- व्यासपीठतीच्या कल्पनेतील एक ब्रह्मांड फिरस्ती

तीच्या कल्पनेतील एक ब्रह्मांड फिरस्ती

एक काल्पनिक कथा….
ती म्हणजे “ज्योती” आणि दीप हे दोघे नवरा बायको नुकतच लग्न झालं होत लग्नाला ६-७ महिने झाले होते, थोड लव थोड अरेंज मॅरेज होत ,

झालं अस होत की दीप नेहमी कामात गुंतून असायचा, दीप तालुक्यात कामाला होता तर ज्योती पणं तिथेच तालुक्यात बँकेत कामाला होती.

ऑफिस ची काम दोंघाची ही व्हॉट्स ॲप वर बोलण पणं असायचं पणं दीप तितकाच बोलायचा,
कामाला जास्त महत्व द्यायचा, पणं ज्योती कडे ही काहीतरी जबाबदारी होती त्याची याकडे त्याच जरा दुर्लक्ष च व्हायचं.

आजपर्यंत त्याने कधी प्रेमाचे काही बोल बोलले नव्हते ती ही तिच्या नोकरीत बिझी असायची च म्हणा पण खूप प्रेम करायची ती दीप वर..अफाट.जीव होता तिचा तिच्या दीप वर ,
प्रेमाने ती त्याला ” दिपू” म्हणायची..

घरी आले जरी दोघे तरी कामात असायचे , तो कुठे क्रिकेट पाहत बसायचा तर ही कुठे जेवणात गुंतून असायची, तर कधी मालिका पाहण्यात , तर कधी व्हॉट्स ॲप चॅटिंग, एकमेकांच बोलण , एकमेकांना भरवण या धावत्या जगात राहूनच जायचं.

तिला खूप आवड होती प्रेमा त राहण्याची, स्वप्नात जगण्याची, त्याच्या सोबत सप्त धनू चे रंग उधळावे तसे मनसोक्त जगण्याची..

पण हा नेहमी कामात असायचा

ज्योतीथोडी धार्मिक होती त्यामुळे ती देवाशी खूप बोलायची, हितगुज करायची..
खूप घट्ट मैत्री होती देवाची आणि तिची.,

एकदिवस काय झालं ज्योती ने चक्क देवाला भेटायला जायचं विचार केला त्यालाच आपली हृदयाची कळ सांगावीशी वाटली..

एक फ्लाईट च तिकीट मिळवलं कस बस आणि ,

ज्योती : आजच रात्री फिरस्ती करून येऊयात ब्रह्मांडात, म्हणून रवाना झाली,
हाताच्या रेषा जरा चेक करून याव्या आणि जरा हालचाल विचारून यावी देवांची,.
बरेच दिवस झाले कामातून देवाशी चॅटिंग पणं होत नव्हतं तीच.
देवांना जाताना काय घेऊन जाऊ बर …
काय घेऊ विचार करत मोदक, आणि पुरणपोळ्या घेऊन गेली .

देवाच्या जगात आहाहाहा ssss…
हा काय स्वर्ग सुंदर होता काय बोलावं शब्द नव्हते., काय ती फळ, काय ती फुल, झाड, निसर्ग, गवळ न्याना खेळण्यासाठी झोपाळे, काय तिकडचे रस्ते, फुलांनी सजवलेले,
कचरा दिसायला तयार नाही आणि एक जमिनीवर मेले जाईल तिकडे कचरा,..

स्वच्छ कस राहावं कोणी स्वर्गात येऊन पाहावं नाहीतर काय..

जस गेली तस देवाची पर्सनल असिस्टंट (P.A) भेटली म्हणत होती मॅडम इकडे कुठे….कस काय येन केलं…
ज्योती : म्हटल विचारावं देवाला काय काय चाललय….कस काय कामकाज चाललंय.आणि मला खूप इच्छा होती भेटायची..हल्ली देव इतका बिझी असतो की ऑनलाईन दिसत नाही….

पण गणेश जी मात्र ऑनलाईन होते आताच चतुर्थी संपली ना, जमिनीवरून नुकतेच स्वर्गात विराजमान झाले होते, त्यामुळे रिद्धी आणि सिध्दी जाम मागे लागल्या होत्या, विचारपूस करत होत्या.
त्या म्हणत होत्या अहो गणेश जी सांगा तरी काय काय पाहुणचार झाला खाली भूतलावर

पण गणेश जी फक्त चॅटिंग

आणि काय जमिनीवरचा परिणाम, गेल्यापासून फक्त व्हॉट्स ॲप

बिचाऱ्या रिद्धी, सिद्धी त्यांना पाहून वाटत होत ऑनलाईन बुकींग करून २ मोबाईल घेऊन आले असते तर बर झालं अस्त..

काय सांगू आमच्या दिपू च पणं तसच आहे ऑनलाईन असतो पणं जगासाठी माझ्यासाठी वेळच नसतो.,

देवाची मीटिंग झाली, देव काय कमी बिझी असतो जगाची सगळी डोकेदुखी देवाला च सोडवावी लागतात पाप वाटत देवा च पणं ३३ कोटी देव १०० कोटी जनता कुठे कुठे धावणार थकत असेल बिचारा.

वाईट वाटत देवाचं हा सगळ्याची दुःख कमी करत असतो आणि मी आहे की माज रडणं सांगायला आले ..

थोड्यावेळात देव आले.,
देव बसले आपल्या आसनावर मी गेली देवाच्या जवळ जाऊन बसली
ज्योती:
: (नमस्कार करत ) कसे आहात तुम्ही देवा

हे पुरणपोळ्या आणि मोदक थकला असाल थोड खाऊन घ्या.

देव: बर केलीस आणलीस आजच मी देवीला सांगितल होत पोळ्या खायच्या इच्छा झाली आहे तू आणलीस देविंचा पोळ्या करण्याचा ताप वाचला.
मी मजेत तू बोल कस चाललंय तुझ
थोड तोंड उतरलेलं पाहून म्हणालाच मला देव “काय ग ‘काय झालं ?

ज्योती: सहज आले रे देवा कसा आहेस विचारावं..

देव : ते तर तू मला व्हॉटस ॲप कॉल केला असता तरी सांगितल अस्तच की …
सांग बाळा काय झालं

मी म्हटल देवा हाताच्या रेषा …….

देव: काही टेन्शन घेऊ नकोस दोघांच्या नावच्या बरोबर लिहिल्या आहेत मी
का ग का टेन्शन घेतलीस
७ महिने झाले लग्न करून किती जीव जडला आहे माझा यांच्यावर तुला माहीतच आहे ना रे देवा, अशी प्रेम करणारी त्यांना कोणी मिळेल का ?

आणि काय सांगू माज प्रेम बघून दगड काय पर्वताला ला पणं प्रेम होईल…
देव: हो आहेच तस तुझ प्रेम मग काय झालं ?

ज्योती: अरे देवा कामात तर सगळेच असतात मी काही प्रेमाचं म्हटल ना की हे म्हणतात दगड बनाव लागत..जगात जगताना नाहीतर मी वाचेन का.,मन कठीण करावं लागत.

आणि हे ह्रुदयात दगड निर्मिती करत आहेत म्हणतात
यांचं काही डोक बिक फिरल य काय,

PA तर चक्क हसत च होती, आणि देव पणं..

ज्योती: मग रागाने मी दिपू ला अशी व्हॉट्स ॲप करते..
‌साठलेले दगड शेतात बांध घालण्यासाठी , घर बांधण्यासाठी , रस्ता करण्यासाठी, विहिरीच्या कामासाठी , तलावात आणि नदीत दगड मारून मारून पाणी वाढवण्यासाठी, शेतात पक्ष्यांना मारण्यासाठी, अत्यंत उपयुक्त आहेत त्यामुळे आपल्याला आपल्यातले कोणतेही गुण वाया नाही घालवू द्यायचे ….दिपू

–माझ्या प्रेमा पासून तर वाचन अशक्य च आहे, इतकं प्रेम आहे मला यांच्यावर..
बघितला स ना देवा वटपौर्णिमेच्या दिवशी हाच भेटावा म्हणून मी १४ फेऱ्या मारल्या उगाच नाही मारल्या..
अरे देवा दुसर काही नाही प्रेम नाही होऊ देरे पणं दगडांनी त्यांचं हृदय वजनाने जड नाही का होणार…
त्याचीच काळजी आहे बस…
देव म्हणाला काही काळजी करू नकोस बाळ..
हृदय जड झालं की दगड फेकून देईल

ज्योती : मी नेहमी मेसेज केला ना काय झालं, what happened दिपू , काय बोलणा सोन्या?,
Reply फक्त nothing, nothing, nothing याच्या पलीकडे काही नसतो वाटत तसाच मोबाईल फेकून भिंतीवर आपटावा.

तुला माहित नाही देवा…..sss
खूप संयम बाळगते आणि मोबाईल सांभाळते बघ कारण मला माहित आहे माझा मोबाईल फुटला की हे काय घेऊन देणार नाही…
आणखी मज्जा वाटेल बर झाल डोक्याचा ताप गेला,
तूच सांग ना रे देवा इतकं छळायच अस्त का आपल्या दुसऱ्या बायकोला म्हणजे पहिली बायको “नोकरी ” ही प्रत्येक पुरुषाची पहिली बायको असते ना म्हणून म्हटल. तसच अस्त.

देव : मग काय करू सलमान खान, शाहिद कपूर, अल्लू अर्जुन, गोविंदा , यांच्यातलं कोणी नाव लिहू का हाताच्या रेषावर, या प्रेमाची लफडी डोक फिरवतात खरच

ज्योती : देवा sss, तूम्ही पणं अस बोलणार का आता.

देव : एक काम कर त्याच्या साठी प्रेम पत्र लिह , तुला काय बोलायचं आहे ते मांड आणि दे , नक्की समजेल त्याला,..
बस इथे निवांत तोवर मी एक मीटिंग ला जाऊन येतो..

लग्ना अगोदर तिने प्रेम पत्र लिहिली होती..तिला खूप आवडायचं आपल्या भावना मांडायला, व्हॉट्स ॲप ला चॅटिंग करत बसण्यापेक्षा त्याच्यासाठी काहीतरी लिहीन वगैरे..
ज्योती : ( चिडून ) बस पत्र च लिहत बसते तोवर वयाची ७० वी तरी येईलच, PHD मिळवली असती एखादी आत्तापर्यंत..

_प्रेमपत्र

प्रिय दिपू,

तुझी ज्योती आहे मी ओलखलास, काय ते पणं आठवण करून देऊ, बायको आहे तुझी मी , नशिबाच्या रेषा अगदी ठळक पने हातावर दिसतात की रे तुलाच कस काय दिसत नाहीत…

काय तू असा वेड्या सारखा करतोस.,, म्हटल नवीन नवीन लग्न आहे थोडा वेळ लागतोच समजायला, माणूस ओळखायला भावना समजायला पणं इतका वेळ लागतो का माझ्या भावना समजायला..
हे कितव पत्र लिहिते आठवत नाही बघ अस वाटत शाळेत आणि कॉलेज ला पुरवण्या लिहून ८०% तरी मिळवले मी , पणं ही पत्र लिहून तुझ्या ह्रुदयात किती % फिक्स झाले काही कळतच नाही..

अस पणं काही अस्त का प्रश्नपत्रिका सोडवत जायचं उत्तर पत्रिका काय सवडीने कळणार आहे..काही तरी संयम बाळगण्याची ताकत आहे की नाही मला..

कामातून मेसेज केला की काय करतेस जेवलीस का इतकीच प्रश्न आणि जे ऐकायचं अस्त ते तर तू बोलतच नाहीस..
Good morning
Good night
Good day
अरे ज्यासाठी कान तरसलेत ते पणं तर बोलत जा.
अश्यावेळी मला ना “फुगे” चित्रपटात ला स्वप्नील जोशी आठवतो तो नेहमी चिडला की इतकचं म्हणायचा….”अरे मुद्दा काय आहे”

मुद्दा आहे प्रेमाचा , जिव्हाळ्याचा , दोन शब्द प्रेमाने बोलण्याचा, काळजी असण्याचा ते शब्द ऐकले ना की मन प्रसन्न होत ,
तू कशी आहेस विचारतोस नेहमी, मी तुझ्यासारखी आहे तुझी च सावली आहे..
माझा काळजाचा तुकडा कसा आहे विचार ना कधीतरी मला नाही का बरं वाटणार.

मी पणं एक जीव आहे नारे मी किती वेळा वाचून दाखवू तुला माझ्या प्रेमाचा ग्रंथ..
काही बोलणार आहेस का मी च किती बोलायचं
तुला नाही का बोलवत कधी
प्रेमाच्या दोन गोष्टी

तू आज आलास ना की आपण मस्त सुट्टी घेऊ, एखादा चित्रपट पाहू, गमतीजमतीचा खेळ खेळू, बोलत बसू गप्पा मारू, एकमेकांना जीव लाऊ एकत्र जेऊ, तू मला तुझ्या मनातल सगळं सांग मन लाऊन ऐकेन..
मी ही तुला एखादी स्वप्नतली गोष्ट सांगेन, एखादी कविता येत असेल तर म्हणून दाखवेन, आकाशातले चांदण्या कश्या लुकलुकत असतात तश्या माझ्या प्रेमाचा प्रेमळ साज तुला मी दाखून देईन..

बोलतोस ना तू पणं की मी नेहमी तुझ्या सोबत आहे, मी जास्त दूर नाही जवळच आहे….
हे काय बोलन झालं कारे दिपू..
मी जास्त दूर नाही म्हणजे कुठवर आला आहेस खिडकी पर्यंत , दरवाजा पर्यंत किचन पर्यंत, हॉल पर्यंत ही असली कसली रे उत्तर तुझी
मी तुझ्यातच आहे तू माझ्यात आहेस.. संपल ना

शाळेत तरी नीट पास झाला आहेस ना की कॉप्या करून पास झाला आहेस, ..

Hi dear कशी आहेस, विचारतोस ना पणं माझा ही तुझ्यात जीव आहे म्हणायला का थांबतोस…
तूझ्या मनातल प्रेम मला कळत रे पणं शब्दांनी व्यक्त व्हावं समोरच्या माणसाला काय आनंद होतो हे जगून बघ…ना

आठवत का दिपू प्रथम आपण भेटलो होतो, रस्ता क्रॉस करताना नकळत हातात हात आले होते, का म्हणून होते ते आपण काही सज्ञान नव्हतो एकमेकांचा हात पकडायला की लहान मूल होतो, पणं ते हात एकत्र आले कारण मनात ” प्रेम ” होत.
प्रवास आपला तिथूनच चालू झालेला …

आयुष्यात आपल्या संकट, अडचणी येणार च आहेत पणं एकमेकांचा हात नाही सोडायचा आहे, त्यावेळी मनात तू खूप भरून गेलास, स्वतः रस्ता पार करून गेलाही अस्तास आणि मी ही आली असती, पणं आपल्या मनातल्या जिव्हाळ्याने आपल्याला जोडून ठेवलं.

आयुष्यातील धावते रस्ते , अवघड कोड , येणाऱ्या अडचणी , वादळ, विरह , प्रेमाचे क्षण , कर्तव्य, सांसारिक जबाबदाऱ्या , कामाचे ताण, लोकांची मन जपन, नाती जपणे, स्वतः ची काळजी घेणे, येणाऱ्या ऋतू प्रमाणे जगणे, वैचारिक पातळीवर काळानुसार बदल करणे, कधी मनसोक्त जगणे, कधी प्रेमात हरवून जाणे, कधी काहीतरी स्वप्न पूर्ण करणे, आयुष्यातली संकट येणार च आहेत आपण आपला हात नाही सोडायचा आहे काळजीपूर्वक आपण आपल नात जपायच आहे.पोटच्या गोळ्याला जस जपतो अगदी तस…

गेल्यावेळी काय म्हणाला त मी खूप नशीबवान आहे मला खूप प्रेम करणारी लोक मिळाली,..

अस नाही म्हणाला त माझी बायको किती प्रेम करते म्हणून …बोटाना त्रास झाला असेल ना तेवढं लिहायला

खूप नाराज आहे मी तुझ्यावर दिपू..खूप.

काहीतरी सुचत य मला तुझ्यासाठी खास….

मोहबत को भी मोहब्बत हो जाएगी इतनी मोहब्बत करते है..हम आपसे…
पत्थर क्या चीज है….परबत भी हिला देगे
दुवा करते है उन्हे हमसे हमारी जितनी मोहब्बत हो जाये ,
उसदीन तो कयामत से कयामत आ जाये गी,
उन्हे लगता है हम हस्ते खेलते नहि,
कोई उन्हे जाके बताये ,
हमारी हसी से ही पेड पौधे फुल खील उठते है,
आस्मान मे चांद भी हम से खील उठता है,
बस एक आप हो जो,हमे कभी समझ नही पाये ,
जिंदगी के साथ जीना है आपको लेकर,
हरपल हर घडी ना हो, एक एक दीन का एक एक पल तो हो,
आंखरी सांस तक जीना है आपके साथ,
जो इश्क हुवा है सच्चे दिलं से निभाऊंगी..
आपकी हाथ की लकिरे कूच्छ इस तरह से बदल के जाऊंगी,
मेरा खुदा मेरी इबादत है मोहब्बत कोई जाकर पूच्छे तेरी पेहचान क्या है…
जवाब होगा….मोहब्बत मोहब्बत मोहब्बत,
तकदिर लिखने बैठे थें खुदा,
हमारी मोहब्बत देखकर तकदिर बदल दि,
आप क्या झांक रहे हो अपने दिलं मे अभितक,
अब क्या खुदा को बुलाऊ ,
मोहब्बत को सजदा करनेतक,
ये दीलो के राज भी गजब रंग ढाते है,
कभी रुलाते तो कभी हसाते है..
कमाल थे हिर रांजा कहते हैं,
हमारी दिलं की किताब भी पढ लेना कभी..
आपका का भी नाम होगा लीखा उसमे
मोहब्बत मोहब्बत मोहब्बत

आवडली का हिंदी कविता तुझ्या प्रेमात मला काय सुचेल आणि काय नाही..

एक उखाणा घेते हा…दिपू…

मराठीच्या प्रेम पत्रात लिहिली मी हिंदी कविता,.
मराठीच्या प्रेम पत्रात लिहिली मी हिंदी कविता,.
किती जीव गुंतला गुरफटला तुला कसा कळेना
दीप तुझ नाव घेते नवरा म्हणून ,
आता तरी ओळख नाहीतर पुढच्या जन्मी तूच माझ्या माझ्या मागे मागे फिरशिल भवरा म्हणून….

माझ्या मनातल मन सांगितलय तुला कळलं ना की अजून कोणता ग्रंथ लिहू” प्रेमग्रंथ ” वगैरे..

ग्रंथ लिहिण इतपत भाषा जमणार नाही रे मला दिपू,
तुझे मौल्यवान शब्द तू लोणचं, मुरंबा, गुलकंद घालायला ठेऊ नकोस..
वाट पाहते तुझ्या रिप्लाय ची….

तुझीच दिपज्योत…
…;;:…..

देव : झालं का पत्र लिहून ?

ज्योती : हे बघ देवा
देवाला पत्र पाहून चक्कर च आली …..किती लिहिते स ग तू…?

ज्योती; प्रेम देवा प्रेम …

ज्योती : मला एक सांग देवा हे प्रेम उत्पादन केलास पणं याच काही औषध का नाही बनवलास
देव: अरे ते जरा वेगळीच भावना आहे.. हो पणं त्या भावनेत मग कधी कधी त्याग करावा लागतो त्याच काय ,?

देव: हो बाळा तसच आहे करावं लागत त्याग

ज्योती: मग त्याग करायचा च अस्तो तर मग प्रेम का होत होऊच नये ना..
मी सांगू प्रेम म्हणजे काय……

प्रेम म्हणजे देवाचं सुंदर रूप ,
प्रार्थनेत दरवळणारा लावलेला धूप,
प्रेम म्हणजे प्रसादातल साजूक तूप,
प्रेम म्हणजे दिपज्योती च “प्रतिरूप”

देव : धन्य आहे तुझ प्रेम …
आलीआहेस तेंव्हापासून काही खाल्ल नाहीस, काय खाणार? रागाने लाल टोमॅटो झाली आहेस..
ज्योती: आम्ही भेटलो तेंव्हा हेच खाल्ल होत म्हटल मसाला डोसा असेल तर द्या त्याच्या आठवणीत खाईन.. व कॉफी..
.मस्त पाहुणचार घेऊन कालच्या फ्लाईट ने ज्योती रिटर्न…जमिनीवर..

……..———………….

अशीच काहीतरी वेडी होती ज्योती ,
वाचून हसू हे आले असेल .
मला हे सांगायचं आहे या कथेच्या माध्यमातून
आजकालच्या काळात लोक खूप बिझी असतात प्रत्येकाच्या स्वतःच्या नात्याला नवरा बायकोला, आई बाबांना, भाऊ बहिणी ना वेळ देण खूप गरजेचं आहे, काम कधी संपणार नाहीत, जबाबदाऱ्या आहेत स्वतःचा आवाज ऐकून प्रत्येकाने प्रत्येकाला वेळ द्या..आपल्या मनातल्या प्रेमाला शब्दांची जोड द्या ..प्रेम करणाऱ्या व्यक्ती प्रेमाने राहायला बघतात त्यांना काही मौल्यवान वस्तू नको असतात त्यांचे जीवन साथी हेच मौल्यवान देणगी असते आणि त्यांना जपण्याचा ते खूप प्रयत्न करतात..
सतवण काही हद्दी पर्यंत ठीक अस्त पणं तुमच्या सारखच समोरच माणूस घट्ट असेल अस नाही ना हळवं असू शकत.

ज्योती सारख्या असंख्य स्त्रिया आहेत ज्या नवऱ्याकडून मिळणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी साठी इच्छा बाळगून असतात आणि साहजिकच आहे त्यांचा अधिकार आहे तो, सध्या व्हॉट्स ॲप आणि सोशल मीडिया इतकं काही हातात अस्त की स्टेटस आणि चॅट स त्यात नोकरी या सर्वांत आपल्या लोकांना हवं ते बोलण्याचा हवं ते प्रेम देण्या कडे कल असला पाहिजे असं घडल पाहिजे, हे चित्र बदलल पाहिजे,

धन्यवाद
रुपाली स्वप्नील शिंदे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular