Homeआरोग्यओठ फुटलेत ? उपाय काय ?

ओठ फुटलेत ? उपाय काय ?

ईजीवनसत्त्व आणि बीवॅक्स युक्त लिप बामनं ओठांवर सतत मसाज करत रहा. यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत. ओठांचा ओलावा दिवसभर टिकून राहायला हवा. लिप बामऐवजी तुमचं नेहमीचं मॉइश्चरायझिंग क्रीमही लावू शकता.

  1. ओठांवरची मृत त्वचा दूर करण्यासाठी मृदू स्क्रबचा वापर करा. ओठांना नवतजेला मिळवून देण्याचा प्रयत्न करा. साखर आणि पेट्रोलियम ली जेयांचं मिश्रण घरगुती स्क्रब म्हणून वापरता येईल. मऊ टूथब्रशनीही ओठांचं स्क्रबिंग करता येईल. स्क्रबिंगद्वार मृत त्वचा काढून टाकल्यावर ओठांना मॉइश्चरायझर किंवा लिप बाम लावा.
  2. फुटलेल्या ओठांवर लिपस्टिक चांगली दिसत नाही. त्यामुळे आधी लिप बाम लाऊन मगच लिपस्टिक लावा. लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम ओठांमध्ये मरवून घ्या. ओलसरपणा टिकवून ठेवणारी लिपस्टिकही तुम्ही निवडू शकता.
  3. ओठांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी त्यावर वारंवार जीभ फिरवू नका. यामुळे ओठ जास्त कोरडे पडतील. फुटलेल्या ओठांवरची त्वचा काढून टाकू नका. यामुळे ओठाला जखम होऊन रक्त येण्याची शक्यता असते.
  4. बाहेरचं वातावरण थंड असलं तरी सूर्याची अतिनील किरणं त्वचेला हानी पोहचवतातच. त्यामुळे एसपीएफयुक्त लिप बाम निवडा. यामुळे सूर्याच्या घातक करणांचा ओठांवर विपरीत परिणाम होणार नाही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular