कला

आपल्याकडे असे म्हणतात की, प्रत्येक व्यक्तिमध्ये एक कला असते. हे गुण असणे खूप महत्वाचे असते. आपल्यात असणारी कला ओळखणे व त्याला न्याय देणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.
माणसाची ओळख त्याच्यामध्ये असणाऱ्या कलेवरुन होत असते. त्यामुळे आपल्यात कलाकार, व्यावसायिक, गायक-गायिका, लेखक-लेखिका, कवी-कवयित्री, संगीतकार, वादक आणि खेळाडू यांनी त्यांच्या क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.

http://linkmarathi.com/नीरज-चोप्रा-च्या-भाल्याच/


आजच्या धावपळीच्या युगात जास्तीत जास्त लोक म्हणतात की, माझ्याकडे छंदासाठी वेळ नसतो. हे ते खूप अभिमानाने सांगतात. मला अशा लोकांचे हे म्हणणे बिलकुल पटत नाही. मानसिक संतुलन आणि ताण तणावाला दूर ठेवायचे असेल तर दररोज थोडा वेळ काढून छंद जोपासायला पाहिजे.
मागच्या आठवड्यात नेहमी प्रमाणे पहाटे ५ वाजता व्यायाम करण्यासाठी लिफ्ट असून सुद्धा चौथ्या मजल्या वरून जिना उतरताना तिसऱ्या मजल्यावर दरवाजा समोर सद्या नवरात्र असल्यामुळे देवी अंबाबाई यांची सुरेख रांगोळी दिसली. आणि ती रांगोळी पाहून स्तब्ध झालो. रांगोळी इतकी सुरेख काढली होती की, मला प्रत्यक्ष देवीचे दर्शन घेत आहे असे काही काळ वाटले. तोंडून वाह! आले. मोबाईल घरी असल्यामुळे ताबडतोब घरी जाऊन फोटो आणून फोटो काढला. फोटो काढताना मनात विचार आला की, आपण रांगोळी काढणाऱ्यांची परवानगी घेतली नाही. कधी कधी मी माझ्या चुकांना खुल्या मनाने माफ करतो.

http://linkmarathi.com/तुम्ही-वापरत-असलेल्या-गु/


व्यायाम करून घरी आल्यावर रांगोळीचा फोटो आणि माझ्या कौतुकाचे शब्द रेखाटत व्हाट्सअप वर स्टेटस म्हणून टाकले. त्या भगिनिला मी कधी पहिले नाही पण कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच अपुरे आहेत. रांगोळीचा फोटो आणी माझ्या कौतुकाची थाप लिहून दुसऱ्या मजल्यावर राहत असणारे माझे परम मित्र श्री.आशुतोष राणे यांना पाठवला. त्यांनी लगेच सांगितले कि, ही रांगोळी तिसऱ्या मजल्यावर राहत असणाऱ्या कु. प्रतीक्षा दत्तात्रय नलावडे यांनी काढल्या आहेत. त्यांच्यात असणाऱ्या या कलेला माझा मनाचा मुजरा. त्यांनी ही कला नेहमी जोपासावी ही नम्र विनंती. त्यांना व त्यांच्या कुटुंबाला चांगले आरोग्य, निरामय तसेच आनंदमय जीवन मिळो ही सदिच्छा.

लेखन – श्री.सनी चंद्रकांत कुंभार.

फोटो संकलन – सौ.पूजा आशुतोष राणे

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular