Homeवैशिष्ट्येस्वराज्य जननी राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि आजची स्त्री

स्वराज्य जननी राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि आजची स्त्री

एक स्त्रि दुसऱ्या स्त्रिचे करत असलेले शोषण थांबवून स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ च्या विचार आणि कार्यातून समाजामध्ये स्त्रियांनी शिवबा घडविण्यासाठी प्रयत्नशिल राहावे. कारण शिवबा घडविण्याची ताकत, कुशलता एका स्त्रि मध्ये असते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊमनोज प्रल्हाद गावनेर

छत्रपति शिवाजी महाराज सारखा सर्वगुणसंपन्न राजा देऊन महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या, स्वराज्य संकल्पक, मुत्सद्दी राजकारणी राजमाता मॉंसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.
संपूर्ण जगात वंदनिय व्यक्तिमत्व घडविण्यात एका स्त्रि ची भूमिका आणि योगदान सर्वात जास्त असते. स्त्रि ने ठरविले तर शिवबा सारखा चारित्र्यवान, रयतेचा राजा घडवू शकते हे सिद्ध करणाऱ्या राजमाता जिजाऊ.
स्वराज्याची मुहुर्त रोवत असताना त्यांनी शिवरायांमध्ये पेरलेले विचार हे कृतीतून पेरले. स्वराज्यामध्ये शेतकरी संपन्न असणे महत्त्वाचे असल्याचे हे जाणुन त्यांनी सर्वप्रथम कार्य केले. आदिलशहाचा सरदार पंडित मुरार जगदेव कुलकर्णी याने पुण्याच्या ज्या जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून तिथे तुटलेली चप्पल बांधून जो ती जमीन नांगरेल तो निर्वंश होईल असा शाप दिला होता त्याच भूमीवर जिजाऊंनी पाच वर्षाच्या #शिवबा च्या हाती सोन्याचा फाळ असलेला नांगर फिरवला. मनुवादी ज्यांना अतिशूद्र समजत होते त्यांनाही सोबत घेतले. म्हणजे जिजाऊंनी त्यावेळी अंधश्रद्धेचे जोखड झुगारून लावले आणि समाजनिर्मितीमध्ये आपले योगदान देत गेल्या.
जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात राबविताना शिवबांमध्ये निर्माण केलेली सामाजिक जाण, मुत्सद्दीपणा यामुळे शिवबांचे चारित्र्य सर्वतोपरी वंदनिय ठरले.
शिवबांवर वैचारिक संस्कार करत असताना त्यांच्यामध्ये धर्माचा आंधळा अतिरेक होऊ दिला नाही. सर्वधर्मसमभावाची शिकवण देत असताना सर्व जाति धर्मातील रयतेला आपलेसे करण्याची भावना निर्माण केली.
आजची स्त्रि ही जात-पात, अंधश्रद्धा – व्रतवैकल्ये व उपासतापास यांचा अतिरेक, धर्मग्रंथ नसलेल्या थोतांड पोथ्या – व्रत, भविष्य, बुवाबाजी, अनेक प्रकारच्या अंधश्रद्धेच्याच विळख्यात अडकली असल्याने आपल्या मुलांवर ही तसेच संस्कार करते. यातून मुलांमध्ये अंधश्रद्धा फोफावते आणि सारासार विचार न करता जाति धर्माप्रति अतिसंवेदनशील तयार होते. मोठमोठ्या पदांवर काम करणाऱ्या काही स्त्रिया सुद्धा “आम्ही मॉडर्न असूनसुद्धा परंपरा, संस्कृती ला विसरलो नाही” हे दाखवण्यासाठी या परंपरा निभावण्याच्या नादात अंधश्रद्धेला धरून आहेत. याला कारणीभूत स्त्रियांमध्ये आपल्या महापुरुषांचे विचार पोहचत नाही आणि गृहिणींचे जीवन तर एका चौकटीच्या आतच जगत असल्यामुळे विचारही भितीदायकच बनते आणि यातुनच तयार होते अंधश्रद्धा. आपल्या महापुरूषांनी जीवघेण्या, शारिरीक शोषण करणाऱ्या अनेक प्रथा अस्तित्वहिन केल्या. माँसाहेब जीजाउंनी अशा अनेक प्रथांना त्यावेळी नाकारले. पण अजूनही मानसिक शोषण करणाऱ्या नवनविन थोतांडाला बळी पडणे काही अंशी चालूच आहे. नितिमत्तेचे धडे देणाऱ्या ग्रंथांची शिकवण मान्य असावी. पण ज्या ग्रंथांचा उद्देश केवळ भीती, द्वेष व अंधश्रद्धा पसरवून कमाई करणे असेल त्याला जाळून टाकण्यातच अर्थ असतो. आजही बऱ्याच ग्रामीण भागात एखादी स्त्रि सामाजिक जाणिवेने मुक्त संचार करत असेल तरिसुद्धा अनेक सामाजिक दडपणांना सामोरे जावे लागते आणि सर्वांच्या अनुभवात आलेली एक गोष्ट म्हणजे “एक स्त्रिच दुसऱ्या स्त्रिचे शोषण करते”. स्त्रि पुरूषांनी सामाजिक उपक्रम राबवित असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मिळून केलेल्या कार्यांचा आदर्श ठेवावा. मुला मुलींवर संस्कार करत असताना माता जिजाऊंचे उच्च विचार समजून घेऊन त्याप्रमाणे करावे. सोशल मिडियाच्या अतिशय वेगवान आयुष्यात खरे काय आणि खोटे काय हे ओळखण्याची प्रतिभा बाणवली पाहिजे. यासाठी गरज आहे ती खऱ्या अर्थाने राजमाता जिजाऊ समजून घेण्याची व परिस्थितीसापेक्ष त्याप्रमाणे वागण्याची..
नवनिर्मितीची आणि जगातील महान व्यक्तिमत्त्व घडविण्याची कुशलता असणाऱ्या सर्व माय माउलींना मानाचा मुजरा..
आज स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त देशभरात आपण युवक दिन साजरा करतो. म्हणून देशाला आदर्श युवक देण्याचे कौशल्य आईमध्ये असते म्हणून प्रत्येक माता माऊलीने जीजाऊं कडून ध्यास घ्यावा, विचार घ्यावा..
जय जिजाऊ ..!! जय शिवराय..!!!

✍🏻- मनोज प्रल्हाद गावनेर
मु.पो. मंगरूळ चवाळा, ता. नांदगाव खंडेश्वर, जिल्हा – अमरावती

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular