26 सप्टेंबर च्या संक्षिप्त घडामोडी
जम्मूत दोन दहशतवादी ठार, सुरक्षा दलांची मोठी कारवाई; त्यांच्याकडून दोन AK-47 रायफल, दोन पिस्तूल आणि 4 ग्रेनेड करण्यात आले जप्त
मराठवाड्यातून खान्देशला जोडणारा 174 किलोमीटरचा रेल्वेमार्ग लवकरच, या रेल्वे मार्गाचा अंतिम सर्वे तयार; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’मध्ये महत्त्वाची घोषणा, आदरांजली म्हणून चंदीगड विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचा घेतला निर्णय
‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
थायलंडमधून फेक जॉब ऑफर, थायलंडमधील नोकरी टाळा; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला; एजंट्स सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून देतात नोकऱ्यांची ऑफर

मुख्यसंपादक