नवी दिल्ली -: पुरुषांच्या तुलनेने महिलांचा उद्योग , व्यवसाय श्रेत्रातील सहभाग अगदी नगण्य आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढावी या हेतूने केंद्र शासनाने ही स्त्री शक्ती पॅकेज योजना आणली आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी ही योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. ययोजने अंतर्गत महिलांना 25 लाख रुपया पर्यत कर्ज मंजूर करण्यात येणार असून 5 लाख रुपये कर्जासाठी कोणतेही तारण ठेवण्याची त्यांना गरज नाही . या योजने अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेशी सहकार्य करार झाला आहे. या बँकेच्या देशभरात सर्वत्र शाखा असल्याने महिलांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे शक्य होईल.
दोन लाख कर्जासाठी व्याज दरात अर्धा टक्का सवलत
दोन लाख कर्जासाठी 0.5 % ( अर्धा टक्का ) सवलत मिळणार आहे . सूक्ष्म , लघू , मध्यम उद्योगासाठी नोंदणीकृत कंपनी 50 हजार पासून 25 लखापर्यत कर्ज मिळणार आहे. यासाठी केवळ 5 % व्याज आकारणी लागेल.
एक दृष्टीश्रेप ‘ स्त्री शक्ती पॅकेज योजना ‘
किरकोळ व्यापारासाठी कर्ज – 50 हजार ते 2 लाख
व्यवसाय उपक्रमासाठी कर्ज – 50 हजार ते 2 लाख
व्यवसायासाठी कर्ज – 50 हजार ते 25 लाख
एसएसआय साठी अर्ज – 50 हजार ते 25 लाख
संदर्भ – पुठारी
मुख्यसंपादक
Loan
[…] महिलांना विनातरणी 5 लाख कर्ज | व्याज दर … […]