शैलेश मगदूम (निंगुडगे): आजरा येथे अंध व्यक्तीसाठी झालेल्या स्वयंसिद्धता कार्यशाळेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.या कार्यशाळेसाठी आजरा तालुक्यातील अनेक गावातून अंध व्यक्तींनी हजेरी लावली.दोन दिवसीय अंध व्यक्तींसाठी ठेवलेल्या या कार्यशाळेसाठी ब्रेल मॅन ऑफ इंडियाचे स्वागत थोरात व स्वरूपा देशपांडे मार्गदर्शक म्हणून लाभले.मान्यवरांच्या हस्ते रोपला पाणी घालून कार्यशाळेचे उदघाटन केले.या कार्यशाळेत पांढरी काठीची माहिती व तिचा उपयोग कसा करणे,शास्त्रशुद्ध पद्धतीने काठी वापरण्याचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष वापर करण्याचा सराव,इतर ज्ञानेंद्रियांचा वापर सक्षमतेने कसा करायचा याबद्दलची माहिती,दिशांची ओळख,स्नायूंची लवचिकता टिकवण्यासाठीचे सोपे व्यायाम प्रकार,वेगवेगळी धान्य ओळखणे ,पक्षांचा आवाज अशा अनेक प्रकारचे शिक्षण देण्यात आले.या कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी दाजी दाइंगडे,आरोग्य विभाग पर्यवेक्षक जे.सी.भोईर,नेत्ररोग तज्ञ डॉ. सदानंद पाटणे,जे.पी.नाईक पतसंस्था अध्यक्ष शिवशंकर उपासे यांची उपस्थिती व मनोगत व्यक्त झाले .स्वागत, प्रास्ताविक व आभार अवधूत पाटील यांनी मांडले.
मुख्यसंपादक