पुणे – (प्रतिनिधी ) : बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सिरम इंस्टीट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.
सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील इमारतीला भयंकर आग लागली ; ही माहिती मिळताच श्रणी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
आग विझवल्यावरच आगीचे नेमके कारण समजू शकेल अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे. उर्वरित एका कर्मचाऱ्याचा शोध घेतला जात असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण शोधले जात आहे.
दरम्यान, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनच्या ‘कोविशिल्ड’ या लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इंस्टीट्यूटमध्ये होत आहे.
हिंदुस्थानमध्ये या लसीच्या आपातकालीन वापराला परवागनगीही मिळाली असून लसीकरणाला सुरुवातही झाली आहे. ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
मुख्यसंपादक