चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड मतदारसंघ हा विस्ताराने मोठा आहे. संपूर्ण ग्रामीण भाग असल्याने आजही लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. लोकांची साधी प्रशासकीय काम देखील होत नाहीत, त्यांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात, हेच लोकप्रतिनिधीचं अपयश आहे. प्रशासनावर पकड असावी लागते. प्रशासन हाताळण्याचे कौशल्य आवश्यक असते. त्यासाठी सक्षम नेतृत्व निवडण्याची संधी असून लोकांनी पाठीशी राहावे असे आवाहन मानसिंग खोराटे यांनी केले. शनिवारी (दि. 03 नोव्हेंबर रोजी) गडहिंगलज येथील जनसुराज्य शक्ती पक्ष संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सध्या निवडणूक कालावधीमध्ये कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांना संपर्क करता यावा, भागातील यंत्रणा लावण्याच्या दृष्टीने हे कार्यालय सुरू केल्याचे खोराटे यांनी स्पष्ट केले.
यावेळी बसवराज आरबोळे ,अरुण गवळी, विलास कदम ,मंजुनाथ बंदी ,पप्पू इंचनाकर ,अक्षय पाटील, सचिन परीट, किशोर भोसले, किशोर शिंदे, बाळू गडदे ,सुनील नांगरे ,आदेश विचारे ,रवी चौगुले, सुनील गवळी, सुनील नांगरे, अशोक जाधव, अजित दावणे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
- शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा, विजय आपलाच
चंदगड मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे. त्यामध्ये गडहिंग्लज हा महत्वाचा भाग असून चार जिल्हापरिषद मतदारसंघ येतात. या भागातील कार्यकर्त्यांना नियोजन आणि प्रचारासाठी या कार्यालयाचा वापर होणार आहे. तरी सामान्य नागरिकांशी संवाद ठेवून मतदारसंघासाठी आपले व्हिजन, केलेली कामं आणि पक्षाची ध्येय धोरणे व नारळाची बाग हे आपल्या पक्षाचे चिन्ह तळागाळात पोहचवा. त्यातून जास्तीत जास्त लोकांना आपल्याशी जोडा, काहीच दिवस राहिले असून शेवटच्या माणसापर्यंत, त्याच्या घरापर्यंत पोहचा, एवढी वेळ कष्ट घ्या, विजय आपलाच आहे असं आवाहन खोराटे यांनी कार्यकर्त्यांना केले.
मुख्यसंपादक