जायफळ हे झाड १५ ते २०मी उंचीचे असते. जांभळीच्या पानासारखे साम्य पानात असते. नर आणि मादी अशी वेगवेगळी झाडे असतात. लागवड करताना नर ५०% तर , मादी ४५% तर संयुक्त फुले असलेली ५% लावावी लागतात. (१०मादी झाडामागे १ नर झाड लावणे फायद्याचे ठरते ; नाहीतर मादी झाडास आलेल्या फुलापासून फळे येणार नाहीत ) याची फळे चिकूच्या आकाराची असतात त्यात टरफलाच्या आतील भागात गुलाबी रंगाची जाळी असते जिला जायपत्री म्हणतात.
टरफला पासून चटणी, लोणची, मुरंबा , इ बनवतात. मिठाई , मसाले यात जायफळ वापरतात. यांच्या तेलाचा उपयोग चॉकलेट , टूथपेस्ट, औषधे इ. मध्ये करतात. जास्त सेवनाने झोप येते.
ओषधी उपयोग-:
- अतिसारावर जायफळ चूर्ण टाकातून द्यावे .
- अन्नाच्या चवी सोबतच शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. पण ते मादक असल्याने योग्य प्रमाण असावे.
- शारीरिक थकवा किंवा कमजोरी व तणाव बाहेर काढण्यासाठी उपयुक्त.
- जायफळाचे तेल व तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन चोळावे त्यामुळे सांधेदुखी वर प्रभावी उपाय आहे.
- तोंडावरील मुरुमांस जायफळ दुधात उगाळून मुरुमावर लेप करावे.
- डोके दुखत असेल तर पाण्यात वाटून लेप लावावा.
- थंडीमुळे लहान मुलांना शौचालयाला लागते त्यावर जायफळ व सुंठ गाईच्या तुपात उगाळून चाटण द्यावे.
- पोट फुगून शौचालय होत नसल्यास जायफळ लिंबाच्या रसात उगाळून द्यावे.
- झोप येत नसल्यास जायफळ तुपात उगाळून डोळ्याच्या आजूबाजूला लेप करावा. मात्र डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- उचकी किंवा मळमळ होत असल्यास जायफळ तांदळाच्या धुवणात उगाळून द्यावे.
- एक ग्लास दुधातून चिमूटभर जायफळ घेतल्यास सर्दीचा त्रास होत नाही.
- अंगात उष्णता असताना किंवा उष्ण प्रदेशातील लोकांनी जयफळाचे सेवन करू नये.
- निसर्गउपचार तज्ञ
मुख्यसंपादक