आजरा ( अमित गुरव) -: तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय असे फोन कॉल वर खोटे सांगून आजाऱ्यातील निवृत्त प्राध्यापिकेकडून ३० लाख उकळले असून या बातमीने आजरा तालुक्यात खळबळ माजली आहे.
संबंधित प्राध्यापिका ही २८ डिसेंबर २०२४ ते १७ जानेवारी २०२५ अखेर मी अंधेरी पोलीस स्टेशन मधून बोलतोय तुमच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची भीती दाखवत कॉल केला. आणि त्यावेळेस त्या अज्ञात व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे त्याने दिलेल्या खात्यावर २९ लाख ९३ हजार १५० रुपये पाठवले . पण त्यानंतर प्रधापिकेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आजरा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सदर गुन्हाच तपास गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी इंगवले यांच्या आदेशाने भुदरगड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक लोठे यांना दिला आहे. सेवानिृत्तीनंतर केलेली गुंतवणूक हडपण्यात अज्ञातला यश प्राप्त झाले आहे. आता नागरिकांनी सतर्क राहून अज्ञात कॉल पासून सावध राहायला हवे हे नक्की..

मुख्यसंपादक